बुलंदशहर (उत्तर प्रदेश) - हे माझ्या कर्माचे फळ आहे, असा उल्लेख असलेली चिठ्ठी लिहून उत्तर प्रदेश पोलीस दलातील एका महिला सब इन्स्पेक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरजू पवार असे या महिला पोलिसाचे नाव असून, त्यांनी फंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.ही घटना उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथील अनूप शहर पोलीस ठाणे क्षेत्रात घडली. सदर महिला पोलीस इन्स्पेक्टर एका घरात भाडेकरू म्हणून राहत होत्या. तिथेच त्यांनी गळफास घेत जीवन संपवले. या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ७ वाजता घरमालकाने जेवणासाठी विचारणा केली असता तिने काही वेळात येणार असल्याचे सांगितले. मात्र बराच वेळ होऊनही त्या न आल्याने घरमालकाने खोलीत डोकावून पाहिले असता तिथे त्यांनी गळफास लावल्याचे दिसून आले. त्यानंतर घरमालकाने सदर प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.आरजू पवार या २०१५ च्या बॅचच्या सब इन्स्पेक्टर होत्या. त्या शामली येथील रहिवासी होत्या. त्यांच्या खोलीमधून एक पत्र मिळाले आहे. त्यामध्ये आरजू पवार यांनी त्यात हे माझ्या कर्माचे फळ आहे, असे लिहिलेले दिसून आले. मात्र पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.याबाबत एसएसपी संतोष कुमार सिंह यांनी सांगितले की, आज महिला पोलीस सब इन्स्पेक्टर आरजू पवार यांनी आत्महत्या केली. आता या संपूर्ण प्रकरणाची तपासणी सुरू आहे. घटनास्थळावरून दोन ओळींचे पत्र जप्त करण्यात आले आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या मृत्यूसाठी स्वत:लाच जबाबदार ठरवले आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाच पुन्हा एकदा गंभीरपणे तपास करण्यात येत आहे.
"हे माझ्या कर्माचं फळ’’, पत्र लिहून महिला पोलीस सब-इन्स्पेक्टरची आत्महत्या
By बाळकृष्ण परब | Published: January 02, 2021 11:10 AM
Women Police Suicide News : सदर महिला पोलीस इन्स्पेक्टर एका घरात भाडेकरू म्हणून राहत होत्या. तिथेच त्यांनी गळफास घेत जीवन संपवले
ठळक मुद्देआरजू पवार असे या महिला पोलीस सब-इन्स्पेक्टरचे नाव त्यांनी फंख्याला गळफास लावून आत्महत्या केलीआरजू पवार या २०१५ च्या बॅचच्या सब इन्स्पेक्टर होत्या. त्या शामली येथील रहिवासी होत्या