शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

जामनेरमध्ये कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना फळ विक्रेत्यांकडून मारहाण; ठार मारण्याचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 11:44 PM

Crime news: फत्तेपूर येथे वेळेची मर्यादा संपल्यानंतर बाजारातील दुकाने सुरू होती. हा बाजार हटविण्यासाठी पोलीस कर्मचारी अनिल सुरवाडे, दिनेश मारवडकर व होमगार्ड गेले होते.  

जामनेर  जि. जळगाव : निर्धारित वेळेनंतर सुरु असलेला बाजार हटविण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांना फळ विक्रेत्यांनी मारहाण केली.  एकाने पोलिसाच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाल्याची घटना फत्तेपूर ता. जामनेर येथे सोमवारी सकाळी ११ वाजता घडली. यात एकास अटक करण्यात आली आहे. (two policemen beaten by fruit seller in Fattepur)   

फत्तेपूर  येथे वेळेची मर्यादा संपल्यानंतर बाजारातील दुकाने सुरू होती. हा बाजार हटविण्यासाठी पोलीस कर्मचारी अनिल सुरवाडे, दिनेश मारवडकर व होमगार्ड गेले होते.  त्यावेळी  युसूफ शब्बीर खाँ पठाण, अश्रद युसूफ पठाण, महेमुद शब्बीर खाँ पठाण, इजाज महेमुद पठाण व मोहसीन  महेमूद पठाण (रा. फत्तेपूर) यांनी पोलिसांना विरोध केला. यामुळे गोंधळ उडाला, गर्दी जमा झाली. 

या गोंधळातच पोलिसांना मारहाण झाली. तसेच सुरवाडे यांच्या डोक्यात दगड घालून मारण्याचा प्रयत्न केला.  या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहूल खताळ हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.  त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. याबाबत पोकॉ. अनिल सुरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  वरील  पाच जणांविरुद्ध पहूर पोलिसात  रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अश्रद  पठाण याला अटक करण्यात आली आहे. तर चार जण पसार झाले आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस