काँग्रेस शहर अध्यक्षाच्या घरी जुगार अड्डा; १४ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 08:28 PM2021-10-04T20:28:06+5:302021-10-04T20:31:33+5:30

Gambling Case : सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

A gambling den at the home of the Congress city president; 14 arrested | काँग्रेस शहर अध्यक्षाच्या घरी जुगार अड्डा; १४ जणांना अटक

काँग्रेस शहर अध्यक्षाच्या घरी जुगार अड्डा; १४ जणांना अटक

Next
ठळक मुद्देअवधूतवाडी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे रविवारी रात्री धाड टाकून १४ जुगाऱ्यांना अटक केली.

यवतमाळ :  येथील संकटमोचन परिसरात राहणारे काँग्रेसचे यवतमाळ शहर अध्यक्ष चंद्रशेखर चौधरी यांच्या घरी जुगार भरविला जात होता. अवधूतवाडी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे रविवारी रात्री धाड टाकून १४ जुगाऱ्यांना अटक केली. तसेच सहा लाख ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


यवतमाळ नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते नगरसेवक तथा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चंद्रशेखर हरिकिशोर चौधरी यांच्या फ्लॅटमध्ये जुगार सुरू होता. पोलिसांनी मधुकर प्रेमचंद गावंडे रा. अंबानगर, राजकुमार केशवराव बनसोड रा. कोलुरा ता. नेर, सुभाष राजाराम वानखेडे रा. अंबानगर, दीपक बापूराव थोरात रा. दारव्हा रोड, विजय अशोकराव सुरस्कर रा. जयविजय चौक, उमेश रमेश उपाध्ये रा. देवीनगर, श्रीकांत मारोतराव बावणे रा. साईनगर, राजबहाद्दूर किशोरीलाल राजपूत रा. शारदा चौक, अल्पेश रणजित फुलझेले रा. उमरसरा, शेख हकीम शेख करीम रा. गिलाणीनगर, नितीन डोमाजी चव्हाण रा. कावेरी पार्क, दर्शन रमेश कोठारी रा. दाते कॉलेज चौक असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. पोलिसांनी धाड टाकताच तेथून दोन लाख १५ हजार ८७० रुपये रोख, १४ मोबाईल, आठ मोटर सायकली असा सहा लाख ८ हजारांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ५, ४ मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर अधीक्षक खंडेराव धरणे, ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे, संजय राठोड, गजानन दुधकोहळे, कुणाल पांडे, सागर चिरडे, समाधान कांबळे, प्रकाश चरडे यांनी केली.

Web Title: A gambling den at the home of the Congress city president; 14 arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.