लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्हिडिओ गेमच्या आड सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. झोन पाचच्या पथकाने यशोधरानगर ठाण्याच्या अंतर्गत वनदेवी चौक येथे धाड टाकून हा अड्डा चालविणाऱ्या मुख्य आरोपीसह ९ जणांना ताब्यात घेतले आहे.अड्डा चालविणारा मुख्य आरोपी हुसेन अली जब्बार अली (४६) रा. एकता कॉलनी हा आहे. इतर आरोपींमध्ये सलीम शाह सलाम शाह (२३), शेख सलमान शेख असलम (२८) रा. वनदेवी चौक, खुर्शिद अंसारी पीर मो. अंसारी (३९) रा. हबीबनगर, आरिफ रशीद अंसारी (२९) मो. रमजान अंसारी (२८) रा. प्रवेशनगर, राजा राजेश खरे (२३), फिरोजुद्दीन वसीजुद्दीन खान (२४) रा. वनदेवीनगर आणि शेख सरफराज शेख युसूफ (२६) रा. वांजरा यांचा समावेश आहे. हुसेन अलीने वनदेवी चौकात एका दुकानात हा जुगार अड्डा सुरू केला. व्हिडिओ गेमच्या आड तो हा जुगार अड्डा चालवीत होता. याची माहिती झोन पाचच्या पथकाला मिळाली. त्यांनी मंगळवारी तेथे धाड टाकली. तेथे हुसेन अली इतर आरोपींसह रंगेहात सापडला. त्याच्याजवळ व्हिडिओ गेमचा कुठलाही परवाना नव्हता. पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यांची झडती घेतली असता व्हिडिओ गेमच्या मशीनसह २.३७ लाखाचा मुद्देमाल आढळला. पोलिसांनी आरोपींविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. यशोधरानगर ठाण्याच्या परिसरात कामगारांची संख्या मोठी आहे. त्यांना जुगार खेळण्याचे व्यसन आहे. इलेक्ट्रॉनिक जुगार असल्यामुळे तेथे दिवसभर युवकांची गर्दी राहते. हुसेन अली यातून खूप पैसे कमवीत होता. ही कारवाई पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, विनोद सोनटक्के, चेतन जाधव, मृदुल नगरे, अशोक दुबे, रवींद्र राऊत यांनी पार पाडली.
नागपुरात व्हिडिओ गेमच्या आड सुरू होता जुगार अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:07 AM
व्हिडिओ गेमच्या आड सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. झोन पाचच्या पथकाने यशोधरानगर ठाण्याच्या अंतर्गत वनदेवी चौक येथे धाड टाकून हा अड्डा चालविणाऱ्या मुख्य आरोपीसह ९ जणांना ताब्यात घेतले आहे.
ठळक मुद्देमुख्य आरोपीसह ९ जणांना अटक : झोन पाचच्या पथकाची कारवाई