नागपूर : गुरांच्या गोठ्यात जुगार अड्डा चालविणाऱ्या व जुगार खेळणाऱ्या २० जणांना ताब्यात घेऊन झोन पाचच्या विशेष पथकाने त्यांच्याकडून १० लाख ५७ हजार १८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संजय हिरामन येंडे (वय ५३, रा. आवंडी नविन कामठी) याने आपल्या राहत्या घरी गुरांच्या गोठ्यात जुगार अड्डा भरविला होता.
या जुगार अड्ड्यावर आरोपी प्रशांत तुकाराम वाघ (वय ३४), रामेश्वर नारायण ढोके (वय ३०), लक्ष्मण लहुजी कडु (वय ४०) रा. कडोली, रुपेश मालाराम गेचोडे (वय ३६), प्रथमेश प्रविण येंडे (वय २३), प्रमोद कुंजीलाल बोरकर (वय ५५), सोनल दामोदर चंदनखेडे (वय ३३) सर्वजण रा. आवंडी, वेदांत अनिल मानवटकर (वय १९, रा. बोरगाव), ओम विलास क्षिरसागर (वय १८), अंकुश गौतम मानवटकर (वय २४), अमोल भारात मानवटकर (वय २२) सर्वजण रा. जाकेगाव, मौदा, हाफीज अब्दुल शेख (वय ३६), सोमेश्वर दामोदर नखाते (वय ३२), आकाश रविंद्र सांगोळे (वय २३, रा. गुमथळा), प्रविण देवचंद मेश्राम (वय ३२), मन्ना मारोतराव ठाकरे (वय २९), नितीन शेषराव भोयर (वय २४), सहाही रा. गुमथळा, कामठी, जितेन्द्र गंगाधर येणेकर (वय ४२), राहुल भगवान सहारे (वय २७, रा. दिघोरी, मौदा) आणि प्रमोद यादवराव ठाकरे (वय ४५, रा. दिघोरी, कामठी), अशी आरोपींची नावे आहेत.
शुक्रवारी ५ जानेवारीला रात्री ९.३० वाजता झोन पाचच्या विशेष पथकातील अधिकारी व अंमलदारांना नविन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरोपीच्या घरी गुरांच्या गोठ्यातजुगार सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली. पथकाने तेथे धाड टाकून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून रोख १ लाख ७ हजार ५०५ रुपये, ताश पत्ते, मोबाईल, दारुसाठा, मोटारसायकल, फ्रीज, म्युझिक सिस्टीम, कुलर, सोफा असा एकून १० लाख ५७ हजार १८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध कलम ६५(ई), ६८, ८४, सहकलम ४, ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई झोन पाचचे पोलिस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.