शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

माणुसकीला काळीमा! Corona Vaccine देण्याचं आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 4:28 PM

Crime News : कोरोना लस (Coronavirus Vaccine) देण्याच्या बहाण्याने एका तरुणीवर सामूहिक बलात्कार (Gang rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे सर्व प्रयत्न केले जात आहेत. देशात लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. बिहारमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कोरोना लस (Coronavirus Vaccine) देण्याच्या बहाण्याने एका तरुणीवर सामूहिक बलात्कार (Gang rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी एका तरुणीला लस देण्याचं आमिष दाखवत एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. 

तरुणीने बलात्काराला विरोध केला असता आरोपींनी तिचे हात-पाय बांधून तिच्या तोंडात रुमालही कोंबला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी याचा अधिक तपास केला असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील जमुनापूर परिसरात ही भयंकर घटना घडली आहे. एका तरुणीला आरोपीला कोविड लस देण्याचं आमिष दाखवून जमुनापूर भागातील एका निर्जन घरात नेण्यात आलं. याठिकाणी दोघांनी पीडित तरुणीसोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. 

पीडित तरुणीने याला विरोध केला. तेव्हा आरोपींनी हात-पाय घट्ट बांधले. तिच्या तोंडात रुमालही कोंबला. यानंतर दोन्ही आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. पीडितेने तरुणी आपली सुटका केली आणि घरी पोहचली आणि तिने तिच्यासोबत घडलेल्या भयंकर घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. नातेवाईकांनी जमुनापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

खळबळजनक! रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर असणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर बलात्काराचा प्रयत्न 

कोरोनाग्रस्त महिलेची ऑक्सिजन लेव्हल कमी असल्याने तिला काही वेळ ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. याच दरम्यान रुग्णालयातील वॉर्ड बॉयने महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या मुलाने केलेल्या तक्रारीत शनिवारी रात्री एक वॉर्ड बॉय त्याच्या आईच्या वॉर्डमध्ये आला. महिला कोरोना संक्रमित असल्याने त्या ठिकाणी दुसरं कोणीही उपस्थित नव्हतं. याचाच गैरफायदा घेत त्या वॉर्ड बॉयने आईसोबत चुकीचे वर्तन सुरू केले. यानंतर आईने आरडोओरडा करायला सुरुवात केली. महिलेने आरडोओरडा केला असता वॉर्ड बॉय तेथून फरार झाला. त्यानंतर कोरोनाग्रस्त महिलेने आपल्या मुलाला कॉल करून हा सर्व धक्कादायक प्रकार सांगितला. तसेच याबाबत कळताच मुलाने आपल्या नातेवाईकांसह रुग्णालय गाठलं. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी वॉर्ड बॉयला अटक केली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतBiharबिहारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस