शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

उत्तर प्रदेश पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दुखावल्याने केली आत्महत्या; पोलिसांचेही निलंबन

By पूनम अपराज | Published: October 14, 2020 6:20 PM

Gangrape : बुधवारी सकाळी मृतदेह अंत्यसंस्कार करण्याची तयारी करण्यापूर्वी सामाजिक संस्थेच्या कामगारांनी रस्त्यावर जाम करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी परिस्थितीवर नियंत्रण आणले आहे. तणावपूर्ण वातावरणामुळे गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्हा मुख्यालयापासून 20 कि.मी. अंतरावर असलेल्या 15 वर्षीय तरुणीने मंगळवारी सकाळी 9.00 वाजताच्या सुमारास स्वत: ला गळफास लावून आत्महत्या केली.

चित्रकूट - अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिने आत्महत्या केल्याने तणावपूर्ण परिस्थिती उद्भवली आहे. रात्रीच, आयजी आणि कमिशन यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि कोतवाली प्रभारी व चौकी प्रभारीला निलंबित करण्यात आले. त्याचवेळी बुधवारी सकाळी मृतदेह अंत्यसंस्कार करण्याची तयारी करण्यापूर्वी सामाजिक संस्थेच्या कामगारांनी रस्त्यावर जाम करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी परिस्थितीवर नियंत्रण आणले आहे. तणावपूर्ण वातावरणामुळे गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.दुखावलेल्या अल्पवयीन मुलीने फास लावून घेतलाजिल्हा मुख्यालयापासून 20 कि.मी. अंतरावर असलेल्या 15 वर्षीय तरुणीने मंगळवारी सकाळी 9.00 वाजताच्या सुमारास स्वत: ला गळफास लावून आत्महत्या केली. घटनेच्या काही काळाआधीच तिचे आई व वडील घरापासून 200 मीटर अंतरावर कॉलनीत गेले होते. अल्पवयीन मुलीचा छोटा भाऊ घराबाहेर खेळत होता, बहिणीला घरात लटकलेले पाहून त्याने आई व वडिलांना माहिती दिली.आईने रडत जबाब दिलातपासणीसाठी आलेले एएसपी प्रकाशस्वरूप पांडे, सीओ सिटी रजनीश कुमार यादव आणि कोतवाल जयशंकर सिंह यांना मृत पीडित तरुणीच्या आईने रडत सांगितले, 8 ऑक्टोबर रोजी रात्री 1.30 च्या सुमारास घराबाहेर दुचाकीवरून मुलीचे अपहरण केले होते. सुमारे 500 मीटर अंतरावर, तरूणाने त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि त्यांनी तिचे हात पाय बांधून  फेकले होते. शोध घेत असताना ती बांधलेली आढळली. यावर सरैयां पोलिसांनाही माहिती दिली होती, मुलगी आरोपीचे नाव सांगू शकली. स्थानिक प्रकरण असल्यामुळे तक्रार केली नाही. घटनेनंतर मुलगी दुःखी झाली होती. कर्वी कोतवाली पोलिसांनी सामूहिक बलात्कार, आत्महत्या, ओलीस ठेवणे, पॉक्सो आणि एससीएसटी कायद्यांतर्गत तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आणि आरोपींचा शोध सुरू केला.मृतदेह येताच गावात संताप अनावरमंगळवारी सायंकाळी शवविच्छेदनानंतर अल्पवयीन मुलीचा मृतदेह रात्री गावात पोहोचला तेव्हा संताप पसरला. रात्रीमुळे अंत्यसंस्कार झाले नव्हते आणि पोलिसांनी सकाळसाठी पूर्ण तयारी केली. लोकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याने वातावरण तणावग्रस्त झाले आणि त्यामुळे पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला. बुधवारी सकाळी एका सामाजिक संस्थेच्या लोकांनी रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घालून तो उचलला.कोतवाली प्रभारी व चौकी प्रभारी निलंबितया घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिस कर्मचार्‍यांनी या प्रकरणात कारवाई न केल्याचे दुर्लक्ष उघडकीस आले आहे. एसपी अंकित मित्तल यांनी सांगितले की, कोतवाली प्रभारी जयशंकर सिंह आणि सरैयां चौकी प्रभारी अनिल साहू यांना माहिती असूनही कारवाई न केल्याबद्दल निलंबित केले आहे. मुख्य आरोपी किशनला अटक करण्यात आली आहे.आप नेते संजय सिंह यांनी योगी सरकारला घेराव घातलासंपूर्ण गावाचे पोलिसांच्या छावणीत रूपांतरित झाले असून बसपा, काँग्रेस, सपासह विविध संघटनांचे लोकही तेथे पोहोचत आहेत. ही घटना आता राजकीय पातळीवर चर्चेचा विषय बनली आहे. आपचे खासदार संजय सिंह यांनीही ट्विट केले आहे की, हाथरसानंतर चित्रकूट ... गुन्हा घडला आहे. त्यांनी योगी सरकारला घेराव घातला आहे, अशी माहिती जागरणने दिली आहे. 

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारSuicideआत्महत्याPoliceपोलिसArrestअटक