वाराणसी : आयआयटी-बीएचयू विनयभंग प्रकरणातील आरोपी मोकाट असतानाच पीडितेचा केवळ विनयभंग नाही, तर तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. पीडितेच्या जबाबानंतर पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचे कलम (३७६ डी) वाढवले आहे. आतापर्यंत ३५४ (ब) आणि ५०९ या कलमान्वये तपास सुरू होता.
पीडितेचा कलम १६४ अंतर्गत बुधवारी दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदविण्यात आला. त्यात तिने आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्याचे सांगितले. त्यानुसार सामूहिक बलात्काराचे कलम वाढविण्यात आले, असे पोलिसांनी आज सांगितले. आता प्रकरणाचा तपास लंका ठाण्याचे प्रमुख शिवकांत मिश्रा यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. वाराणसीचे पोलिस आयुक्त मुथा अशोक जैन यांनी बलात्काराचे कलम वाढविल्याचे सांगितले. मात्र, सामूहिक बलात्कार प्रकरणी अधिक माहिती देण्यास नकार दिला. ते म्हणाले, आता आरोपी पळून जाऊ शकत नाहीत. त्यांना लवकरच अटक होईल. (वृत्तसंस्था)
आरोपींना पकडा, विद्यार्थ्यांचे आंदोलनघटनेला आठवडा उलटत असतानाही तिन्ही आरोपींचा ठावठिकाणा न लागल्याने आयआयटी-बीएचयूचे संतप्त विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
कधी घडली घटना?१ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर आयआयटी-बीएचयू कॅम्पसमध्ये विद्यार्थिनीला कपडे काढायला लावून तिचा व्हिडीओ बनविल्याची घटना उघडकीस आली होती. तेव्हा लंका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.