शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांनीच केला तरूणीवर सामूहिक बलात्कार; भावाची मदतीसाठी विनवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 8:25 PM

Gangrape Case : ऑपरेशन दरम्यान, मुलीने डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्‍यांवर चुकीचे काम केल्याचा आरोप केला आहे.

ठळक मुद्देत्याचवेळी पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुलीला तहान लागली होती. डॉक्टरांनी पाणी देण्यास नकार दिला होता. म्हणूनच ती अस्वस्थ होती. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांनी मोठे ऑपरेशन करून तिचा जीव वाचविला.

डॉक्टरांना आपण देवासारखे मानतो, परंतु उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर येथील  स्वरूपरानी नेहरू  रुग्णालयात दाखल केलेल्या मुलीसोबत घडलेल्या घटनेनंतर डॉक्टरांवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. खरं तर, रूग्णालयात भरती झालेल्या युवतीवर सामूहिक बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. ऑपरेशन दरम्यान, मुलीने डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्‍यांवर चुकीचे काम केल्याचा आरोप केला आहे.त्याचबरोबर सीएमओ आणि मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डॉक्टरांची एक टीम तयार केली आहे. मंगळवारी शहरातील रहिवासी असलेल्या एका तरूणाने रात्री उशिरा सोशल मीडियावर ही गोष्ट सांगितल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. आपल्या काकाच्या मुलीच्या आतड्याला समस्या आल्यामुळे मुलीला 29 मे रोजी  स्वरूपरानी नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे मुलाने सोशल मीडियावर सांगितले. 1 जून रोजी रात्री 11 वाजता डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यासाठी ओटीकडे नेले. दुपारी 1 वाजता जेव्हा ती ऑपरेशन थिएटरमधून परत आली तेव्हा ती बेशुद्ध पडली होती. थोड्या वेळाने, जेव्हा तिला पुन्हा शुद्ध आली तेव्हा तिने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु ती ती काही सांगू शकली नाही. त्यानंतर तिला एक पेन देण्यात आला, त्यानंतर तिने कागदावर लिहिले आणि सांगितले की, काही लोकांनी तिच्याबरोबर चुकीचे कृत्य केले आहे.यानंतर त्यांनी प्रयागराजच्या एसएसपीला फोन करून याबाबत माहिती दिली. थोड्या वेळाने पोलिस दवाखान्यात आले आणि पोलिसांनी चौकशी केली आणि दरम्यान पोलिसांनी पीडित मुलीने लिहिलेली चिठ्ठी फाडली असा आरोप केला जात आहे.

घरातील सदस्यांनी कोणताही आरोप केला नाहीया प्रकरणात डीआयजी  सर्वश्रेष्ठ त्रिपाठी  यांनी सांगितले की, रात्री तक्रार मिळाल्यानंतर सीओ कोतवाली सतेंद्र तिवारी घटनास्थळी गेले होते. पोलिसांनी पीडितेच्या आई आणि इतर नातेवाईकांची चौकशी केली. त्यावेळी असा आरोप कोणीही केलेला नाही. मात्र, अद्याप या मुलीची चौकशी होणे बाकी आहे. मुलगी पुन्हा शुद्धीवर आल्यानंतर तिच्याकडून या प्रकरणात देखील चौकशी केली जाईल. या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांनी एक टीम स्थापन केली आहे.त्याचवेळी पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुलीला तहान लागली होती. डॉक्टरांनी पाणी देण्यास नकार दिला होता. म्हणूनच ती अस्वस्थ होती. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांनी मोठे ऑपरेशन करून तिचा जीव वाचविला.दुष्कर्म झाले आहे माझ्यासोबत या सामूहिक बलात्काराचा आरोप करणाऱ्या भावाने आपल्या बहिणीचा व्हिडिओ आणि हाताने लिहिलेली चिठ्ठी सोशल मीडियावर व्हायरलही केली आहे. त्याच्या बहिणीने लिहिलेली चिठ्ठी,  खोटे बोलले. उपचार काहीच केले नाही. माझ्यासोबत चुकीचे काम केले आहे.सीएमओने समिती गठीत केलीमुलीच्या आरोपानंतर आरोग्य विभागाने चौकशी समिती गठीत केली आहे. सीएमओ डॉ. प्रभाकर राय यांनी ही समिती गठीत केली आहे. समितीला चौकशी अहवाल लवकरच सादर करण्यास सांगितले आहे. या अहवालाच्या आधारे पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल.

टॅग्स :doctorडॉक्टरPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशhospitalहॉस्पिटलsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणSocial Mediaसोशल मीडिया