नांदेड जिल्ह्यात बसस्थानक व शहरात प्रवास करताना माहीलांच्या गळयातील व पर्स मधील सोन्याचे दागीने चोरीचे प्रमाण वाढल्याने चोरट्यांचा शोध करण्याचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलीस निरीक्षकाना आदेश दिले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी त्यांच्या शाखेतील पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांचे पथक तयार करुन नांदेड जिल्ह्यातील बसमध्ये चढताना व प्रवास करता्ना महीलांचे दागीने चोरी करणाऱ्या चोरांचा शोध घेऊन चोरीचे गुन्हे उघडकीस आनण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरिक्षक दतात्रय काळे व त्यांचे पथक बसस्थानक, रेल्वेस्टेशन इतर विविध गर्दीच्या ठिकाणची माहिती हस्तगत करुन त्याचे विश्लेषन करुन तसेच गोपनीय माहीतगार यांच्याकडुन आलेल्या माहितीच्या आधारे नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रवासादरम्यान महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी करणारी एक महिला व तीन इसम यांना नांदेड बसस्थानक येथुन ताब्यात घेतले आहे. त्यांची विचारपुस करुन सखोल चौकशी केली असता त्यांनी पो.स्टे. बजिराबाद, इतवारा, शिवाजीनगर, बारड, कंधार, लोहा, माळाकोळी व माहूर या पो.स्टे. चे हाद्दीत चोरी केल्याचे सांगीतले त्यावरुन रेकॉर्डची पहाणी केली असता एकुण 14 गुन्हे दाखल असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी दिली आहे.