ठाणे - पती आणि मुलांना जिवे मारण्याची धमकी देत एका २५ वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार केल्याची घृणास्पद घटना नालासोपाऱ्यात उघडकीस आली. विबास कार आणि साजिद अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १७ जून रोजी महिलेचा पती आणि मुले घराबाहेर गेलेली असताना आरोपी घरात घुसले आणि त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी वाच्यता केल्यास पती आणि मुलांची हत्या करण्याची त्यांनी धमकी दिली. तसेच, त्यानंतरही १७ जून ते ३० ऑगस्ट या काळात तिच्यावर दोघांनी वारंवार बलात्कार केला. महिलेने पतीला याची कल्पना दिल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार विबास कार आणि साजिदविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला असून अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.