रूड़की : चालत्या कारमध्ये एक महिला आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलीवर एका पुरुषाने आणि त्याच्या मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले. उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील रूड़की येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.
महिलेने तिच्या मुलीला गंभीर अवस्थेत घेऊन पोलीस गाठले आणि घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मुलीला गंभीर अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मुलीवर ३ तास डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. त्याचवेळी महिलेला सोबत घेऊन रात्रीच्या सुमारास कार चालकाचा शोध घेतला. जवळच बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले. दुसरीकडे, पोलिसांनी आईच्या तक्रारीवर सामूहिक बलात्कारासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, ती महिला तिच्या सहा वर्षांच्या मुलीसह रात्रीच्या वेळी पिरान कालियार या मुस्लिम धार्मिक स्थळावरून तिच्या घरी जात होती, तेव्हा सोनू नावाच्या व्यक्तीने तिला लिफ्ट देऊ केली. पोलिस अधीक्षक (ग्रामीण) प्रमेंद्र डोवाल यांनी सांगितले की, त्या व्यक्तीचे काही मित्र आधीच कारमध्ये होते. फिर्यादी महिलेच्या म्हणण्यानुसार, सोनू आणि त्याच्या मित्रांनी महिलेला आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर लिफ्ट देण्याचे आमिष दाखवून चालत्या कारमध्ये बलात्कार केला आणि कालव्याजवळ फेकून दिले.
पोलिसांनी सांगितले की, पीडित महिलेने गाडीत नेमके किती पुरुष होते हे सांगू शकले नसले तरी गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला इतरांनी सोनू म्हणून हाक मारल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी पुढे सांगितले की, महिला आणि तिच्या मुलीला रुडकी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि त्यांच्या वैद्यकीय तपासणीत बलात्कार झाल्याचे समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. मात्र, पोलीस आरोपींचा अद्याप शोध घेऊ शकले नाहीत.