शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
4
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
5
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
7
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
8
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
10
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
11
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
12
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
15
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
16
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
18
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
19
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

ट्युशनहून घरी परतणाऱ्या विद्यार्थिनीवर गँगरेप; पीडितेने विष प्राशन करून केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 2:23 PM

Gangrap victim committed suicide : एसपी देहात केशव कुमार यांनी सांगितले की, गुरुवारी झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेत चार तरुणांचा सहभाग होता.

ठळक मुद्देविद्यार्थिनीची सुसाईड नोट घरातून जप्त करण्यात आली असून विद्यार्थिनीने लखन आणि विकास उर्फ ​​मुरली यांचा उल्लेख केला आहे

मेरठ: उत्तर प्रदेशमधील सरधना कोतवाली परिसरातील पोलिस ठाण्यात एका खेड्यात ट्युशनहून घरी परत येत असलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यावर खेड्यातीलच चार तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. दुखापत झालेल्या मुलीने घरी पोहोचल्यानंतर विषारी पदार्थ सेवन केले असून रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. शुक्रवारी पोलिसांनी ही माहिती दिली. एसपी देहात केशव कुमार यांनी सांगितले की, गुरुवारी झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेत चार तरुणांचा सहभाग होता.पुढे ते म्हणाले की, विद्यार्थिनीची सुसाईड नोट घरातून जप्त करण्यात आली असून विद्यार्थिनीने लखन आणि विकास उर्फ ​​मुरली यांचा उल्लेख केला आहे. कुमार म्हणाले की, त्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून अन्य दोन आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.दुसरीकडे सरधना पोलिसांनी सांगितले की, मुलीच्या कुटूंबियांच्या तक्रारीच्या आधारे पीडित अल्पवयीन दहावीत शिकत होती असून गुरुवारी ती घरून शिकवणी शिकण्यासाठी गेली होती. शिकवणीतून परत येत असताना मुलीला कपसड गावात राहणाऱ्या चार तरुणांनी पळवून नेले आणि टॉवरजवळील घरात सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी सांगितले की, मुलगी कसा तरी बचाव करून तिच्या घरी पोचली आणि घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. नंतर, जखमी विद्यार्थीनीने घरात विषारी पदार्थ खाल्ल्याने तिची प्रकृती अधिकच खराब झाली आणि सायंकाळी सहाच्या सुमारास तिला मोडिपुरमच्या एसडीएस ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. येथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी चौकशी सुरू असून उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटक