शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

खोलीची साफसफाई करण्यास बोलावून महिलेवर केला गँगरेप; हॉटेलचा कर्मचारी देखील सामील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 2:10 PM

Gangrape Case : आरोपींमध्ये हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.

ठळक मुद्देपिवळा शर्ट घातलेला एक माणूस तिला स्वच्छतेसाठी हॉटेलच्या खोलीत घेऊन गेला. या कामाच्या बदल्यात त्याने तिला एक हजार रुपये देण्याबाबतही चर्चा केली.

राजस्थानचे टेक्सटाईल सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भीलवाडा येथील एका हॉटेलमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीने पैशांच्या देवाणघेवाणबाबत बोलून स्वच्छतेच्या नावाखाली महिलेला खोलीत बोलावले. त्यानंतर, तेथे आधीच उपस्थित असलेल्या इतर लोकांसह, तिला दारू पिण्यास लावली आणि नंतर ६ लोकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींमध्ये हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, पिवळा शर्ट घातलेला एक माणूस तिला स्वच्छतेसाठी हॉटेलच्या खोलीत घेऊन गेला. या कामाच्या बदल्यात त्याने तिला एक हजार रुपये देण्याबाबतही चर्चा केली. जेव्हा ती महिला त्याच्यासोबत खोलीत पोहचली तेव्हा तेथे तीन पुरुष आधीच दारू पिऊन बसले होते. महिला सुद्धा तिथे जाऊन बसली. मग या चौघांनी दारू प्यायला सुरुवात केली आणि महिलेलाही दारू प्यायला लावले. त्यानंतर त्यांनी महिलेवर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली.चौघांना जबरदस्ती केल्यानंतर त्यांनी हॉटेलवाल्याला बोलावले आणि सांगितले की, तो हॉटेलचा मालक आहे आणि त्या माणसाने महिलेवर जबरदस्ती केली. दुसऱ्या एका माणसाने तिला ओढून नेले आणि तिला समोरासमोरील खोल्यांमध्ये नेऊन जबरदस्ती अत्याचार करत राहिले आणि तिला खोलीबाहेरून कुलूप लावून बंद केले. तेथून सुटका करून घेतल्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली.भीलवाडा पोलीस उपअधीक्षक (सदर) रामचंद्र यांनी सांगितले की, २८ वर्षीय महिला बाबा धामजवळ मजुरीचे काम करते. तिने आरोप केला की, काल संध्याकाळी एक व्यक्ती तिच्याकडे येते आणि तिला हॉटेल अमित पॅलेसमधील खोली स्वच्छ करण्यासाठी मजुरीवर घेऊन जाते. महिलेचा आरोप आहे की, जेव्हा ती खोलीत जाते तेव्हा मद्यपान केलेले तिच्यावर जबरदस्ती करण्यास सुरुवात करतात. या नराधमांमध्ये ५ ते ६ मुलं आहेत. त्यांच्यामध्ये हॉटेलचा एक कर्मचारी आहे. ती त्याचे नाव सांगत आहे. बाकीची नावे माहित नाहीत.डीएसपीच्या म्हणण्यानुसार, महिलेच्या वक्तव्याच्या आधारे सुभाष नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आता संपूर्ण घटनेची चौकशी केली जात आहे. खात्री पटल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. पोलिसांनी केवळ महिलेच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही स्कॅन केले जात आहे. आतापर्यंत एकाही आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले नाही.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणhotelहॉटेलPoliceपोलिसRajasthanराजस्थान