मुंबई - खंडणीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या गँगस्टर एजाज लकडावाला याचा आतेभाऊ नदीम अब्दुल सत्तार याला गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री मुंबईच्या आंतराष्ट्रीय विमानतळावर अटक केली.दुबईहून परतल्यानंतर त्याला विमानतळ परिसरात पकडण्यात आले आहे. त्याच्याकडून खंडणीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता उपायुक्त शहाजी उमाप यांनी वर्तविली.
एजाज लकडावाला अटक प्रकरण, दोघा पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी
एजाज लकडावालाच्या दुसऱ्या हस्तकाला मुंबईतून अटक
कुख्यात गुंड एजाज लकडावालाचा साथीदार महाराजला बेड्या
बांधकाम व्यावसायिकाला खंडणीप्रकरणी एजाज लकडावाला, त्याचे हस्तक परवीन तारीक, सलीम महाराज यांना जानेवारी महिन्यात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांचे लागेबांधेही समोर आले असून एजाजचा आतेभाऊ नदीमचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याचा शोध सुरु होता. तो परदेशात असल्याने त्याच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. दुबईतून परतणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी रात्री त्याला अटक केली. रविवारी सुट्टीच्या न्यायालयात हजर केले असता ३ मार्चपर्यत पोलीस कोठडी मिळाली, त्याच्याकडून एजाज लकडावालाकडील आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.