पंजाबी गायक सिद्धू मूसवाला (Siddhu Moosewala) हत्याकांडप्रकरणी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने (Lawrence Bishnoi) अखेर आपला गुन्हा कबूल केला आहे. अलीकडेच दिल्ली पोलिसांच्या चौकशीदरम्यान (Police Enquiry) लॉरेन्स बिश्नोईने कबूल केले की, हो आमच्या गॅंगतील सदस्याने मूसेवालाची हत्या केली. यासोबतच लॉरेन्स बिश्नोई म्हणाला की, विकी मिड्दुखेडा कॉलेजच्या काळापासून माझा मोठा भाऊ होता, आमच्या ग्रुपने त्याच्या मृत्यूचा बदला (Death revenge) घेतला. आता गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई मास्टरमाईंड असल्याची माहिती दिल्ली पोलीस आणि विशेष पोलीस आयुक्त (स्पेशल सेल) एच एस धालीवाल यांनी माहिती दिली.
तसेच बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना मिळालेल्या धमकीच्या पत्राच्या प्रकरणात संशयाची सुई गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडे वळली आहे. अभिनेता सलमान खानला दिलेल्या धमकीच्या पत्रासंदर्भात दिल्लीपोलिसांनी तपासाचा फास आवळला असून सोमवारी तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली गेली. त्यावेळी दिल्ली पोलिसांना लॉरेन्स बिश्नोई म्हणाला की, या प्रकरणात त्याचा काहीही हात नाही आणि ते पत्र कोणी लिहिले हे देखील मला माहीत नाही. मात्र, आज सलमान खानच्या धमकी पत्र प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे एक पथक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या चौकशीसाठी दिल्लीत दाखल झाले आहे.
'हो माझ्या गॅंगनेच मुसेवालाचा खून केला', तिहार तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची कबुली
सिद्धू मुसेवालाच्या हत्येत वापरण्यात आलेल्या कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. उत्तराखंडमधून तीन संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर शस्त्रास्त्रांचा पुरवठा केल्याचा आरोप आहे. पोलीस या सर्वांची चौकशी करत आहेत. शिवाय, गोळीबार करणाऱ्यांच्या अनेक साथीदारांना अटकही केली, पण तपास पुढे सरकू शकला नाही. उलट आता या प्रकरणात काही नवीन नावे समोर आली आहेत.