मुंबई : अभिनेता सुशांतसिह राजपूतला मी कधीही भेटलेलो नाही, त्याच्या मृत्यू प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. मात्र रिया चक्रवर्तीला २०१७ मध्ये भेटलो होतो, अशी कबुली हॉटेल व्यावसायिक गौरव आर्याने रविवारी प्रसारमाध्यमांना दिली.दरम्यान, आज सीबीआय अधिकाऱ्यांनी रिया चक्रवर्ती, सिद्धार्थ पिठानी, सॅम्युअल मिरांडा, शौविक चक्रवर्ती आणि नीरज सिंग सलग तिसºया दिवशी चौकशी केली.गोव्यातील अंजुना भागातील टॅमरिंड हॉटेलचा मालक असेलला गौरव गोव्यातील वागाटेर भागात झालेल्या रेव्ह पार्टीतील आरोपी आहे. रियाच्या मोबाइल चॅटमधून गौरवशी असलेले ड्रग कनेक्शन स्पष्ट झाले होते. यासंदर्भात चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्याला ३१ आॅगस्टला मुंबई कार्यालयात हजर रहाण्यासाठी समन्स बजाविले आहेत. त्यासाठी तो रविवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाला. विमानतळावर प्रसारमाध्यमांनी त्याच्याकडे विचारणा केली असता, ‘माझा या खटल्याशी काही संबंध नाही. मी सुशांतला कधीच भेटलो नाही. मात्र रियाला २०१७ मध्ये भेटलो होतो,’ असे सांगत अधिक बोलण्यास त्याने नकार दिला.रियाची सलग तिसºया दिवशी नऊ तास चौकशीअभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील मुख्य संशयित अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यामागील सीबीआयचा ससेमिरा कायम राहिला आहे. रविवारी सलग तिसºया दिवशी तिची विशेष पथकाकडून सुमारे नऊ तास चौकशी करण्यात आली. तिच्यासह भाऊ शोविक, सुशांतचा मॅनेजर सम्युयल मिरांडा, मित्र सिद्धार्थ पिठानी, श्रुती मोदी यांचीही झाडाझडती घेण्यात आली.यांचीही होणार चौकशीगौरवसोबतच अभिनेता एजाज खान आणि १९ जणांच्या चौकशीची शक्यता आहे. त्यात सुशांतची टॅलेंट मॅनेजर जया सहा व श्रुती मोदी यांचीही चौकशी होऊ शकते. रियाचे गौरवसोबत काय संबंध आहेत?, त्यांच्यात ड्रग्ज संबंधित पैशांचा व्यवहार झाला आहे का, याचा तपास होणार आहे.नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) रियासह त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ईडीनंतर सीबीआय आणि एनसीबीचे अधिकारीही त्याची चौकशी करणार आहेत. रिया आणि गौरवचे जुने संबंध असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. गौरवच्या चौकशीतून काही महत्त्वाच्या बाबी समोर येऊ शकतात.
रियाला भेटल्याची गौरव आर्याची कबुली , ड्रग्ज कनेक्शन; ईडीकडून आज कसून चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 7:02 AM