बिहारच्या(Bihar) गयामधून(Gaya) एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने आपल्या मावस बहिणीच्या नादापाई आपल्या पत्नीला घटस्फोट मागितला आहे. पंजाबी कॉलनीतील नितिन लालने २०१६ मध्ये राणी कुमारीसोबत विधिवत लग्न केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, राणी तिचं माहेर झारखंडच्या चतराहून गुरूवारी सासरी पोहोचली. इथे पोहोचल्यावर तिला सासरे, दीर आणि घरातील स्टाफने मारहाण केली आणि घरातून बाहेर काढले.
पीडिता रात्रभर घराबाहेर बसून होती. तिने इंटरनेटवरून फोन नंबर शोधून डीजीपी, आयजी, एसएसपी, डीएसपीसहीत इतर ही अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. तसेच व्हॉट्सअॅपवर त्यांना व्हिडीओही पाठवला. तिला वाटलं कुणीतरी आलं तर तिला रात्रभर रस्त्यावर रहावं लागलं नसतं. पण कुणीच आलं नाही. कडाक्याच्या थंडीत तिने रात्र घराबाहेर काढली. (हे पण वाचा : धक्कादायक! आपल्याच वडिलांच्या प्रेमात पडली मुलगी, आई अन् ९ वर्षीय बहिणीच्या हत्येसाठी केली मदत....)
सकाळ होताच पीडिता राणी कुमारी व्हिडीओ घेऊन गया एसएसपी ऑफिसमध्ये पोहोचली आणि इथे तिने कारवाईसाठी अर्ज केला. राणी कुमारीने सांगितले की, ती चतराहून आपल्या सासरी सकाळी १० वाजता पोहोचली. पण घराला कुलूप होतं. मग तिने सासऱ्यांच्या दुकानात चावी मागितली. तर तिला मारहाण करण्यात आली. तिला घरातून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर तिने पूर्ण रात्र बाहेरचं काढली. (हे पण वाचा : धक्कादायक! विवाहित महिलेचे अनेकांसोबत होते अनैतिक संबंध, त्यातील एकाने रचला मर्डरचा प्लॅन कारण....)
पीडितेने सांगितले की, तिची सख्ख्यी मावस बहीण शिल्पी गुप्तासोबत तिचा पती नितीन लालचं अफेअर सुरू आहे. याची खबर तिला लग्नाच्या काही दिवसातच लागली होती. पण नंतर दोघांमध्ये असं ठरलं की, ते दोघे पुन्हा कधी बोलणार नाही. पण दोघांचं अफेअर सुरूच होतं आणि ते ४ व्हीलरची डिमांड करत आहेत.
पीडितेने सांगितले की, तिच्या वडिलांनी आपली सर्व जमीन विकून तिचं लग्न करून दिलं होतं. यादरम्यान घराखाली असलेल्या लाल नर्सिंग होममध्ये तिचा जबरदस्ती गर्भपात करण्यात आला. याबाबत पीडितेने २०१९ मध्ये पोलिसात तक्रारही दिली होती. पण तेव्हा काहीच कारवाई झाली नाही.
तेच पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सायंकाळी पोलीस घटनास्थळी पोहोचले होते आणि त्यांनी पाहिलं की, मुलाकडच्या लोकांनी घराचा दरवाजा बाहेरून बंद करून ठेवला आहे. त्यांना समजावलं की, सुनेला घरात घ्या. पण त्यांनी काही ऐकलं नाही. नंतर पोलिसांनी महिलेचे सासरे, दीर आणि इतर ३ लोकांना ताब्यात घेतलं.