मुंबई - घाटकोपर येथील हिरे व्यापारी राजेश्वर उदानी हत्याप्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी स्वीय सहाय्यक सचिन पवार पंतनगर पोलिसांनीअटक केली आहे. ७० हजार रुपयांच्या वादावरून ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पवारला गुवाहाटी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी ही देखील होती.
हिरे व्यापारी राजेश्वर उदानी हत्याप्रकरणी अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीचे जबाब नोंदविण्याचे काम पंत नगर पोलीस ठाण्यात सुरु आहे. ७० हजार रुपयांच्या देण्या - घेण्यावरून वाद सुरु होता असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.पोलिसांना या जटिल हत्याकांडाचे धागेदोरे हे उदानीच्या कॉल डिटेल्स म्हणजेच सीडीआरमधून सापडले आणि हत्येचा छडा लागला आहे. २०१० पासून प्रकाश मेहता यांचा माजी स्वीय सहाय्यक म्हणून सचिन पवार काम करायचा. अभिनेत्री देवोलीनचा या हत्येप्रकरणी नेमका काय सहभाग आहे. याबाबत पोलीस तपास करत असून सचिन पवारचे उदानी यांचे २८ नोव्हेंबरला म्हणजे ज्या दिवशी ते बेपत्ता झाले त्या दिवशी १३ फोन कॉल्स असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे सचिन पवार हा पोलिसांच्या रडारवर होता. मात्र, त्याला पोलिसांनी गुवाहाटी येथून बेड्या ठोकल्या आहेत.
घाटकोपर व्यापारी हत्या प्रकरण : 'या' अभिनेत्रीचा पोलिसांनी नोंदविला जबाब