उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधाची माहिती पतीला समजल्यानंतर पतीने पत्नीला मारहाण केली, यानंतर अचानक एक दिवस रात्री पतीने गोळी झाडून आत्महत्या केली. पत्नीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेचा तपास केला, पण ही आत्महत्या नसून पत्नीनेचव हत्या केल्याचे समोर आले.
कपिल चौधरी यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिलने आत्महत्या केली नसून त्याच्या पत्नीने आणि प्रियकराने गोळ्या झाडून त्याची हत्या केली. प्रेमप्रकरणात अडसर ठरल्याने पतीला पत्नीने प्रियकराच्या साथीने तिच्या हत्येचा कट रचला.
३ मार्च रोजी नंदग्राम ई-ब्लॉकमध्ये राहणारा कपिल चौधरी याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. चौकशीत ही हत्या असल्याचे समोर आले. पती कपिल चौधरी हा मूळचा मेरठमधील फलावडा येथील रहिवासी असून त्याच्यावर कर्ज होते. या तणावातून त्याने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचा बनाव केला. पहाटे बंदुकीचा आवाज ऐकून तिने डोळे उघडले तेव्हा तिचा नवरा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि जवळच एक पिस्तूल पडलेले होते, असं पत्नीने पोलिसांना सांगितले.
पत्नीनं घेतला अपमानाचा बदला! प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, त्यानंतर...
पोलिसांना ही घटना संशयास्पद वाटली. गोळी डावीकडून कपिल चौधरी यांच्या डोक्यात लागली आणि उजव्या बाजूने बाहेर आली. पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा तो उजव्या हाताचा वापर करत असल्याची माहिती मिळाली. याच मुद्द्यावर पोलिसांना संशय आला. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि शिवानीचे कॉल डिटेल्स तपासले असता ठोस पुरावे पोलिसांना मिळाले.
यानंतर पत्नी शिवानी ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिची कसून चौकशी केली, सुरुवातीला तिने पोलिसांची दिशाभूल करण्यास सुरुवात केली, मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तिने प्रियकरासह पतीच्या हत्येचा गुन्हा कबूल केला. पती कपिल चौधरीने दोन दिवसापूर्वी मारहाण केल्याच पत्नीने सांगितले.
'काही महिन्यांपूर्वी तिचे मोबाईल दुरुस्तीचे दुकान चालवणाऱ्या अंकुश प्रजापतीच्या प्रेमात पडली होती. पतीच्या वागण्याला कंटाळून शिवानीने तिचा प्रियकर अंकुशसोबत पतीला मारण्याचा कट रचला.
पतीला अंमली पदार्थ पाजले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ मार्चच्या रात्री शिवानीने तिचा प्रियकर अंकुश याला जेवणात अमली पदार्थ पाजले.यानंतर प्रियकराला फोन करून घरी बोलावले होते. यानंतर शिवानीने घरात ठेवलेले पिस्तूल प्रियकराला दिले, त्याने कपिलवर गोळ्या झाडून हत्या केली. अंकुशची हत्या केल्यानंतर ते पिस्तूल कपिलच्या मृतदेहाजवळ ठेवून तो फरार झाला.