दिल्लीतील निहाल विहारमध्ये एका महिलेनं आपल्या पतीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये गिरिडीह या ठिकाणी राहणारा एका आरोपीदेखील सामील आहे. गिरिडीह पोलिसांच्या मदतीनं दिल्लीपोलिसांनी आरोपीला अटक करत बेड्या ठोकल्या.दिल्लीतील निहाल विहार पोलिसांनी हत्येमध्ये सामील असलेला मुख्य आरोपी मोहम्मद अस्लम याला अटक केली आहे. मोहम्मद अस्लम यानं चौकशीदरम्यान आपला गुन्हा कबुल केला आहे. "अनिल साहू आपली पत्नी आणि दोन मुलांसह दिल्लीतील निहाल विहारमध्ये एका भाड्याच्या घरात राहत होते. तसंच ते प्लेसमेंट जॉब करत होते." असं आरोपीनं पोलिसांना सांगितलं. २ जून रोजी अनिल साहू यांच्या पत्नीनं पोलिसांना फोन करुन त्यांची हत्या झाल्याची माहिती दिली होती. अनिल साहू यांच्या चेहऱ्यावर आणि मानेवर जवळपास ४० ते ५० पेक्षा अधिकवेळा ब्लेडने वार केले होते. तर त्यांच्या पत्तीचे कपडेही रक्तानं माखले होते. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केल्याची कबुली दिली. या माहितीनंतर पोलिसांनी अस्लम याचा शोध घेण्यास सुरूवात केली. मिळालेल्या माहितीनुसार अस्लम हा दिल्लीतील अन्य ठिकाणी राहून काम करत होता. २०१९ मध्ये त्या महिलेची अस्लम याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये संभाषणास सुरूवात झाली आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर ते दोघं एकमेकांना भेटत होते. याचदरम्यान दोघांनी मिळून हत्येचा कट रचला होता.