नात्याला काळीमा! वडील आणि भावाने तरुणीला झाडाला उलटं लटकवून बेशुद्ध होईपर्यंत केली बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 15:52 IST2021-07-03T15:46:09+5:302021-07-03T15:52:48+5:30
Crime News : मुलीला माहेरी घेऊन आले. त्यानंतर वडिलांनी आणि भावाने मिळून तिला झाडाला उलटं लटकवलं आणि बेदम मारहाण केली.

नात्याला काळीमा! वडील आणि भावाने तरुणीला झाडाला उलटं लटकवून बेशुद्ध होईपर्यंत केली बेदम मारहाण
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका तरुणीला तिचे वडील आणि भावाने मिळून झाडाला उलटं लटकलं आणि नंतर बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशच्या अलीराजपूरमध्ये ही संतापजनक घटना घडली. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे.
अलीराजपूरचे एसपी विजय भागवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 50 किलोमीटर दूर बोरी ठाण्याजवळील एका गावात 28 जून 2021 रोजी ही धक्कादायक घटना घडली. पीडित तरुणीचा विवाह हा शेजारच्या गावात राहणाऱ्या एका तरुणाशी झाला होता. तिचा पती तिला एकटीला सोडून मजुरीचं काम करण्यासाठी गुजरातला गेला. त्यामुळे नाराज झालेली तरुणी कोणालाही याबाबत काहीही न सांगता आपल्या मामाच्या घरी म्हणजेच आंबी गावात गेली होती.
CoronaVirus Live Updates : ...अन् हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं; मन सुन्न करणारी घटना#Crime#Police#Suicidehttps://t.co/AYtUREMOBf
— Lokmat (@MiLOKMAT) July 2, 2021
तरुणी मामाच्या गावी गेल्यामुळे तिच्या माहेरची मंडळी नाराज झाली. ते मुलीला माहेरी घेऊन आले. त्यानंतर वडिलांनी आणि भावाने मिळून तिला झाडाला उलटं लटकवलं आणि बेदम मारहाण केली. तसेच जमिनीवर आपटून देखील तिला मारहाण करण्यात आली. ती बेशुद्ध होईपर्यंत तिला मारहाण करण्यात येत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. एका स्थानिक व्यक्तीने हा व्हिडीओ काढला असून तो आता जोरदार व्हायरल होत आहे. यामुळेच हा भयंकर प्रकार उजेडात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली असून ते अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
धक्कादायक! फेसबुकवरची मैत्री पडली चांगलीच महागात, परिसरात खळबळ#Crime#Police#Rape#Facebookhttps://t.co/2LERTA0sfN
— Lokmat (@MiLOKMAT) July 1, 2021
धक्कादायक! कोरोनामुळे पत्नीचा मृत्यू; पतीने दोन्ही मुलींची गळा घोटून हत्या करून केली आत्महत्या
देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. कोरोनामुळे अनेक कुटुंबाची वाताहत झाली आहे. अशीच एक घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. हसतं-खेळतं कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झालं आहे. कोरोनामुळे पत्नीचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने पतीने आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूमध्ये ही मन सुन्न करणारी घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे पतीने आपल्या दोन मुलींची गळा घोटून हत्या केली आणि नंतर टोकाचं पाऊल उचललं आहे. मुलींना मारल्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
धक्कादायक! कॉन्स्टेबलने उचललं टोकाचं पाऊल; घटनेने खळबळ#Crime#Police#Suicidehttps://t.co/89p8o9xafO
— Lokmat (@MiLOKMAT) July 1, 2021