शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
4
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
5
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
6
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
7
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
8
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
9
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
10
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
11
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
12
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
13
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
14
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
15
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
16
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
17
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
18
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
20
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी

सामूहिक बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळले; पीलीभीतमध्ये माणुसकीला काळीमा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 7:12 AM

यूपीपाठोपाठ बिहारमध्येही अत्याचाराची घटना 

एस. पी. सिन्हा  पाटणा : बिहारच्या वैशाली जिल्ह्यात पाच युवकांनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून व्हिडिओ व्हायरल केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे, तर उत्तर प्रदेशात १६ वर्षीय दलित युवतीवर बलात्कार करून तिला जिवंत पेटवून दिले. या दोन्ही मुलींची प्रकृती गंभीर आहे. 

बिहारच्या वैशाली जिल्ह्यात एका गावात अल्पवयीन मुलीवर पाच युवकांनी सामूहिक बलात्कार करत व्हिडिओ व्हायरल केला. या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी छापासत्र सुरू केले आहे. ही १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आणि शेजारच्या गावातील तिचा प्रियकर हे भेटण्यासाठी गावाच्या बाहेर पोहोचले होते. याचवेळी येथे पाच युवक दाखल झाले आणि या दोघांना पकडले. या मुलीवर तिच्या प्रियकरासमोर सामूहिक बलात्कार केला. याचा व्हिडिओ व्हायरल केला. 

पीलीभीतमध्ये माणुसकीला काळिमा उत्तर प्रदेशच्या पीलीभीत जिल्ह्यात माधव तांडा परिसरात दोन युवकांनी एका दलिताच्या घरात घुसून १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर या मुलीच्या अंगावर डिझेल टाकून आग लावली. यात ही मुलगी गंभीररीत्या भाजली. हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. 

पोलीस अधीक्षक दिनेश कुमार प्रभू यांनी सांगितले की, ७ सप्टेंबर रोजी या मुलीला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या पीडितेने हा प्रसंग सांगितला, त्याचा व्हिडिओ शनिवारी व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. पीडित मुलीच्या वडिलांनी १० सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, गावातील राजवीर आणि ताराचंद या युवकांनी घरात घुसून मुलीवर अत्याचार केला आणि डिझेल टाकून तिला पेटवून दिले. पॉक्सो, ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे.