उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बरेलीमध्ये प्रियकर नाराज झाल्याने प्रेयसीने विष पिऊन आत्महत्या केली. असं सांगितलं जात आहे की, बरेली कॉलेजमध्ये शिकणारी विद्यार्थीनी बॅंकेत काम करणाऱ्या एका तरूणावर प्रेम करत होती. दोघेही फोनवर तासंतास बोलत होते. गुरूवारी प्रियकराने प्रेयसीला व्हॉट्सअॅपवर फोटो मागितला. प्रेयसीने फोटो देण्यास नकार दिला.
प्रियकर पुन्हा पुन्हा हट्ट करत होता, पण प्रेयसीने तिचा फोटो काही पाठवला नाही. प्रियकराने तिला व्हिडीओ कॉलवर बोलण्यास सांगितलं. प्रेयसीने त्यासाठीही नकार दिला. ज्यामुळे प्रियकर नाराज झाला. त्याने प्रेयसीला धमकी दिली की, तो ट्रेन खाली उडी घेऊन जीव देणार. मग त्याने फोन कट केला. प्रेयसी त्याला सतत फोन करत होती. पण त्याने फोन उचलला नाही. प्रेयसीने त्याला 40 वेळा फोन केला. जेव्हा त्याने एकदाही फोन उचलला नाही तर ती घाबरली.
प्रेयसीला वाटलं प्रियकर खरंच जीव देणार की काय. यामुळे ती घाबरलेल्या प्रेयसीने रात्री घरात पडलेलं विषारी द्रव्य प्यायलं. तिची तब्येत बिघडली तर तिला कुटुंबियांनी लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण तिची तब्येत जास्तच बिघडली. शुक्रवारी उपचारादरम्यान तरूणीचा मृत्यू झाला. यादरम्यान तिच्या प्रियकराला प्रेयसीने विष प्यायल्याचं समजलं. तेव्हा त्याने मेसेज केला की, तुला काही झालं तर तुझ्या घरच्यांना जीवे मारणार.
कुटुंबियांचा आरोप आहे की, बॅंक कर्मचारी संचित अरोराने तिच्यावर दबाव टाकल्याने तिने आत्महत्या केली. तरूणीच्या अंत्यसंस्कारानंतर पोलिसांनी कुटुंबियांच्या सांगण्यावरून तक्रार दाखल केली. सध्या प्रियकर संचित अरोर फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.