20 वर्षांच्या मुलीने कॅन्सर असल्याचं खोटं बोलून लोकांकडे उपचारासाठी पैसे मागायला सुरुवात केली. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आता तिला कॅन्सर नसल्याची माहिती समोर आली आहे. पैसे मिळवण्यासाठी तिने हे सर्व केलं आहे. मुलीने व्हिडीओमध्ये सांगितलं की, तिला पँक्रियाटिक कॅन्सर झाला आहे आणि ट्यूमरचा आकार फुटबॉलएवढा आहे. तिने लोकांना 37,000 डॉलर म्हणजेच जवळपास 30 लाख रुपयांना फसवलं आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, आरोपी तरुणीचं नाव मॅडिसन मॅडी रुसो असं आहे. ती अमेरिकेतील लोवा येथील रहिवासी आहे. मॅडिसन बुधवारी कोर्टात हजर झाली. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, जर ती दोषी आढळली तर तिला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. कॅन्सर ऑर्गेनायझेशन आणि शाळांचा यात समावेश असून 439 देणग्या मिळाल्या आहेत. फसवणुकीचे हे कृत्य तिनं केलं तेव्हा ती 19 वर्षांची होती.
जानेवारीच्या अखेरीस पोलिसांनी तरुणीला अटक केली होती. तिने टिकटॉकवर याबाबत व्हिडीओ पोस्ट केला आहे. GoFundMe वर एक पेज देखील तयार केलं होतं. तिने आपल्या कँपेनच्या पेजवर "या आजारामुळे कुटुंब खूप चिंतेत आहे. मेडिकल बिल, गॅस, अन्न आणि इतर खर्च हे ओझं असू शकतात पण हा कॅन्सरचा आजार असा आहे ज्यासाठी कुटुंबाने खर्चाची चिंता करू नये."
"जे सक्षम आहेत ते वैद्यकीय खर्चासाठी पैसे देणगी म्हणून देऊ शकतात त्यांनी द्यावी, जेणेकरून मॅडी या एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकेल. याद्वारे हे दाखवून दिले जाऊ शकते की ती कॅन्सरपेक्षा मजबूत आहे आणि ती कॅन्सरला हरवेल. देणगी द्या आणि जमल्यास शेअर करा." तरुणीने स्वतःच्या कॉलेजमध्ये कॅन्सरबाबत खोटी माहितीही दिली. सोबतच यासंदर्भात मुलाखतीही दिल्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.