लंडनमधून (London) एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका तरूणीने तिच्या एक्स-बॉयफ्रेन्ड आणि त्याच्या गर्लफ्रेन्डला डुकरां मुंडकं पाठवलं आहे. ज्यावरून चांगलंच वादळ उठलं. आता ही घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या महिलेचं नाव टिया मॅक्बीन आहे. ती ३३ वर्षांची आहे. टियाचा एक्स-बॉयफ्रेन्ड रॉबिन्सन आि त्याची गर्लफ्रेन्ड एका रेस्टॉरन्ट चालवतात. टियाने या रेस्टॉरन्टमध्येच दोघांसाठी डुकराचं मुंडकं पाठवलं.
रॉबिन्सन म्हणाला की, २५ फेब्रुवारी २०१९ मध्ये टियाने आम्हाला डुकराचं मुंडकं पाठवलं होतं. मी सकाळी वाजून ५० मिनिटांना बॉक्स उघडला. ज्यात डुकराचं कापलेलं मुंडकं होतं. मी कधी विचारही केला नव्हता की, ती असं करेल. आता प्रकरणावर कोर्टाचा निर्णय आला आहे. (हे पण वाचा : बोंबला! गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी नको तो प्रयोग केला; थेट हॉस्पिटलात जाऊन पोहोचला!)
टिया आणि तिच्या बॉयफ्रेन्डची भेट मे २०१८ मध्ये झाली होती. ते काही दिवस सोबत होते. रॉबिन्सनने सांगितले की आमच्या रिलेशनच्या काही दिवसातच टियाचा सनकी व्यवहार समोर येऊ लागला होता. ती छोट्या छोट्या गोष्टींवर भडकत होती. मला नंतर समजलं की, तिला बायपोलर डिसऑर्डर आहे. नंतर मी तिला सोडलं. तो म्हणाला की, वेगळे झाल्यानंवर टियाने मला खूप त्रास दिला. तिने मला अनेकदा मेसेज करून शिव्या दिल्या. रात्री उशीरा घराचा दरवाजा वाजवत होती. मला दिवसभरात १०० पेक्षा जास्त वेळा कॉल करत होती. (हे पण वाचा : वाऱ्यामुळे गरोदर झाल्याचा इंडोनेशियातील महिलेचा दावा, सोशल मीडियावर चर्चा)
डेली मेलनुसार, रॉबिन्सनने पुढे सांगितले की, टियाने माझ्या गर्लफ्रेन्डला देखील खूप त्रास दिला. टियाने आमच्या रेग्युलर कस्टमर्सना फेसबुकवर मेसेज पाठवून माझ्या गर्लफ्रेन्डवर अनेक खोटे आरोप लावले. ज्यामुळे आमच्या रेस्टॉरन्टची आणि माझ्या गर्लफ्रेन्डची बदनामी झाली.
दरम्यान, टियाने केलेल्या या कृत्यासाठी वुलविच क्राउन कोर्टाने गुरूवारी तिला १५ महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. निर्णय देताना कोर्टाने सांगितले की, एखाद्याला डुकराचं मुंडकं पाठवणं योग्य नाही. टियाने तिच्या एक्स-बॉयफ्रेन्ड आणि त्याच्या गर्लफ्रेन्डच्या प्रायव्हसीमध्ये लुडबूड केली.