शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

धक्कादायक! दिल्लीत तरुणीवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार, तरुणीला निर्जनस्थळी टाकून आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 3:38 PM

दिल्लीतील प्रीत विहार परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीला कारमध्ये नेऊन सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

दिल्लीतील प्रीत विहार परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीला कारमध्ये नेऊन सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पलवल मार्गावर कार नेण्यात आली. वाटेतच तरुणीवर बलात्कार झाला. यावेळी तरुणीने विरोध केल्यानंतर पिस्तुलच्या धाक दाखवण्यात आला.त्यानंतर रात्री साडेअकरा वाजता निर्जनस्थळी असलेल्या झुडपात ढकलून आरोपींनी पलायन केले. 

पीडितेने ट्रक चालकाच्या मदतीने दिल्ली गाठली. प्रीती विहार पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी या प्रकरणी सामूहिक बलात्कार आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. छापा टाकून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

कुत्र्यांच्या भांडणावरून माणसांमध्ये बेल्टने हाणामारी; पुणे विद्यापीठातील खळबळजनक घटना

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 26 वर्षीय तरुणी मयूर विहार फेज-3 मध्ये आपल्या कुटुंबासोबत राहते. पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ती एका खासगी कंपनीत टेलिकॉलिंगची नोकरी करते. 2017 मध्ये तिचे लग्न झाले होते. लग्नाच्या 15 दिवसांनंतरच तिचे लग्न तुटले. यानंतर पीडितेने लग्नाच्या वेबसाइटवर तिचे प्रोफाईल आणि आयडी तयार केला. त्याच साईटवर तिची एका मुलाशी ओळख झाली. 

12 डिसेंबर रोजी त्याच मुलाने तिच्याशी संपर्क साधला. दुसऱ्या दिवशी 13 डिसेंबरला पुन्हा त्या मुलाचा फोन आला. त्याच्या वारंवार सांगण्यावरून ती निर्माण विहार रेडलाइट येथील ज्यूसच्या दुकानाजवळ त्याला भेटण्यासाठी गेली होती. हा तरुण कारमध्ये मित्राला भेटायला आला होता. काही बोलण्याच्या बहाण्याने त्याने मला कारमध्ये बसवले, वाटेत बोलू लागला. यानंतर तो तिला कॅनॉट प्लेसमध्ये घेऊन गेला. जिथे सर्वांनी रेस्टॉरंटमध्ये जेवण केले. त्या तरुणासोबत त्याचा मित्र कारमध्ये होता. यानंतर कार पलवलच्या दिशेने नेण्यात आली. रात्री मुलाने कारच्या मागच्या सीटवर पिस्तुल दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

आरोपीने तरुणीला मारहाण केली. आरडाओरडानंतर आरोपींनी रात्री 11.30 च्या सुमारास कारमधून ढकलून झाडीत फेकून दिले. यानंतर पीडितेने ट्रकचालकाच्या मदतीने रात्री दिल्ली गाठली. प्रीत विहार पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पीडितेचे मेडिकल केले. तिच्या जबानीवरून सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दीपक आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस