शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
2
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
3
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
4
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
5
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
6
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
7
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
8
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
10
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
11
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
12
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
13
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
15
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
16
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!
17
Maharashtra Assembly Election Result 2024: आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
18
Maharashtra Assembly Election Result 2024: ठाकरे गटाच्या गटांगळ्या! ठाणे-कोकणच्या गडाला खिंडार, शिंदेसेनेपुढे जिंकला फक्त एक आमदार
19
Baramati Vidhan Sabha Election Result 2024 Live : बारामतीचे 'दादा' अजित पवारच! पुतण्याला चितपट करत साकारला ऐतिहासिक विजय
20
Maharashtra Assembly Election Result 2024: दहिसरमध्ये मनीषा चौधरी यांची हॅटट्रिक; शिवसेना उबाठा गटाच्या घोसाळकर यांचा दारूण पराभव 

खळबळजनक! मुलीचे अपहरण करून महसूल कर्मचाऱ्यासह दोघांनी चालत्या कारमध्ये केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 1:35 PM

 ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यात घडली आहे.

ठळक मुद्देया जिल्ह्यात तैनात असलेल्या लेखपालाविरोधात अपहरणानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे सुशील पटेल आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात भा. दं. वि. कलम 376बी, 323, 504, 364 आणि एससीएसटी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे

बांदा (उत्तर प्रदेश) - एका 18 वर्षीय मुलीला चालत्या कारमधून महसूल कर्मचारी व इतर दोघांनी अपहरण केले आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पोलिसांकडे पीडित महिलेने मंगळवारी केला. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यात घडली आहे. या जिल्ह्यात तैनात असलेल्या लेखपालाविरोधात अपहरणानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, लेखपाल नरैनी कोतवालीतील पोलिस स्टेशन अंतर्गत पुंगरी गावात तैनात होता. कोतवाली येथे पीडित मुलीने सोमवारी दाखल केलेल्या एफआयआरनुसार प्रभारी पोलीस निरीक्षक गिरिंद्र सिंह यांनी मंगळवारी सांगितले की, शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास 18 वर्षीय मुलीसोबत ही घटना घडली होती, परंतु त्यानंतर दोन दिवसांनी सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.शनिवारी मुलगी दारात कचरा साफ करत होती, पुखरी गावात तैनात लेखपाल (महसूल कामगार) सुशील पटेल, दोन साथीदारांसह त्याच्या जीपमधून आला आणि मुलीला जबरदस्तीने जीपमध्ये टाकून नेले. मुलीच्या आईने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला ढकलून देऊन खाली खाली पाडण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "पीडित मुलीने तिच्या तक्रारीत लेखपालाने तिच्यावर चालत्या जीपमध्ये बलात्कार केला आणि हनुमान मंदिराजवळ रस्त्यावर जीप थांबली तेव्हा तिने जीपमधून उडी मारुन पळ काढला." पीडितेच्या तक्रारीच्या आधारे सुशील पटेल आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात भा. दं. वि. कलम 376बी, 323, 504, 364 आणि एससीएसटी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

 

 

खाकीला काळिमा! फ्लॅट बळकाविल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक

 

गुड न्यूज! राज्यात ४८ तासात एकही पोलीस कोरोनाबाधित आढळला नाही 

 

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! व्हॉट्स अ‍ॅपवरून मुली पुरवायचे; म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या

टॅग्स :Rapeबलात्कारKidnappingअपहरणPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश