पंजाबमधील एका तरुणाने प्रेमप्रकरणातून अमेरिकेत गळफास घेऊन आत्महत्या केली. तो गुरुदासपूरच्या भैनी मिया खान गावचे रहिवासी होता. लग्नाबाबत बोलल्यानंतर प्रेयसीने (Girlfriend) त्याचा मोबाईल नंबर WhatsAppवर ब्लॉक केल्याचे सांगितले जात आहे. या त्रासाला कंटाळून प्रियकराने (Boyfriend) आत्महत्या केली. मुलाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पंजाबपोलिसांनी (Punjab Police) मुलीची चौकशी केली.नोकरीसाठी अमेरिकेला गेला होता प्रियकर गुरुदासपूरचा रहिवासी असलेला रेशम सिंग 2019 मध्ये नोकरीसाठी अमेरिकेला (America) गेला होता. तेथून तो सतत त्याच्या प्रेयसीशी फोनवर बोलत असे. दोघांमध्ये लग्नाची चर्चा जास्त व्हायची. परदेशातून प्रेयसीच्या मागणीवरून तो पैसेही पाठवत असे. मृत रेशम सिंहच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, रविवारी त्यांच्या मुलाने अमेरिकेतून प्रेयसीला फोन करून लवकरात लवकर भारतात येऊन लग्न करणार असल्याचं सांगितले. हे ऐकून मैत्रिणीने फोन कट केला आणि त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला. त्याला WhatsAppवरही ब्लॉक केले. या त्रासाला कंटाळून त्याने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. मृताच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.मुलीचे कुटुंबीयही पैसे मागायचे याप्रकरणी एसएचओ मेजर सिंह यांनी सांगितले की, मृत मुलाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे की, त्यांचा मुलगा १२वीत शिकत होता. यादरम्यान त्याची एका मुलीशी मैत्री झाली. 2019 मध्ये त्यांचा मुलगा रेशम सिंग अमेरिकेला गेला होता. यादरम्यान तरुणी आणि तिचे कुटुंबीय तिच्याकडे लग्नाच्या बहाण्याने पैसे मागत होते. रेशमने लग्नाबाबत बोलणी सुरु केली असता त्याचा फोन नंबर ब्लॉक होता. त्यामुळे तो खूप अस्वस्थ झाला आणि फसवणूक झाल्याचे त्याला वाटू लागले.याप्रकरणी गुरुदासपूर पोलिसांनी मुलगी, तिची आई आणि भावाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मृताचे नातेवाईक आपल्या मुलाच्या मृतदेहाची वाट पाहत आहेत.
गर्लफ्रेंडने WhatsAppवर केले ब्लॉक, नंतर प्रियकराने अमेरिकेत दिला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 1:13 PM