शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

प्रेयसीने फोन करून प्रियकराला बोलावले; डोक्यावर विटा मारून केली त्याची निर्घृण हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 9:41 PM

Murder Case :लष्करीबागेतील हत्याकांडात खुलासा : चारही आरोपी गजाआड 

ठळक मुद्देशुक्रवारी रात्री ७.४५ ला मुलीने कपिलला फोन करून भेटण्यासाठी बोलविले. त्यानुसार कपिल, त्याचा मित्र अब्दुल सलीम अब्दुल सत्तार याच्यासोबत ८.४५ च्या सुमारास प्रेयसीच्या घराजवळ पोहोचला.

तिने फोन करून बोलविले, त्यांनी हत्या केली नागपूर : नात्यातील मुलीचे प्रेमसंबंध माहित पडल्यामुळे आरोपींनी कपिल श्रीकांत बैन (वय १८) याची हत्या केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, पाचपावली पोलिसांनी आरोपी उमेश रमेश चिकाटे (वय ३४), स्वप्निल उर्फ गोलू बाबुराव चिकाटे (वय २७), अविनाश उर्फ कालू विजय सहारे (वय ३३) आणि विवेक उर्फ भुऱ्या विजय सहारे (वय ३०) यांना अटक केली आहे.

 हे सर्व आरोपी लष्करिबाग परिसरातील तक्षशिला बुद्ध विहारच्या मागे राहतात. मृतक कपिल मोतीबागमधील नोगा फॅक्टरी जवळ राहत होता. आरोपीच्या नात्यातील एका अल्पवयीन मुलीसोबत कपिलचे प्रेम संबंध होते. त्यामुळे तो तिला भेटायला यायचा. आरोपी चिकाटे आणि सहारे यांना ते माहीत पडले. त्यामुळे ते त्याचा काटा काढण्याची संधी शोधत होते. शुक्रवारी रात्री ७.४५ ला मुलीने कपिलला फोन करून भेटण्यासाठी बोलविले. त्यानुसार कपिल, त्याचा मित्र अब्दुल सलीम अब्दुल सत्तार याच्यासोबत ८.४५ च्या सुमारास प्रेयसीच्या घराजवळ पोहोचला. बाजूलाच ते खर्रा खात असताना कपिलच्या मागावर असलेले आरोपी उमेश, गोलू, कालू आणि भुऱ्या त्याच्याजवळ आले. तू इथे कशाला आला, अशी विचारणा करून त्याला मारहाण करू लागले. त्यामुळे कपिलचा मित्र सलीम तेथून बाजूला गेला. आरोपींनी कपिलच्या डोक्यावर विटा मारून त्याची निर्घुण हत्या केली आणि पळून गेले. कपिलची हत्या झाल्याचे माहीत पडल्यामुळे मोतीबाग परिसरातील मोठ्या संख्येतील संतप्त जमाव घटनास्थळी आला. ते आरोपींना शोधू लागले. त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच पाचपावलीचा पोलिस ताफा गुन्हे,  शाखेचे पथक तसेच पोलीस उपायुक्त लोहित मतानी घटनास्थळी पोहोचले. जमाव आक्रमक असल्याचे पाहून त्यांनी शीघ्र कृती दलाचे पथकही तेथे बोलावून घेतले. तणाव वाढल्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त आजूबाजूच्या परिसरात लावण्यात आला. संतप्त जमावाची कशीबशी समजूत काढून पोलिसांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, रात्रभर शोधाशोध करून पोलिसांनी उमेश कालू आणि भुऱ्या या तिघांना अटक केली. तर आज दुपारी स्वप्निल उर्फ गोलू चिकाटे यालाही अटक करण्यात आली. मोबाईलमधून उलगडा

पोलिसांनी आरोपींना हत्येचे कारण विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कपिलचा मोबाईल तपासला असता त्यात त्याच्या प्रेयसीचा त्याला फोन आला होता आणि त्यामुळे तो तिच्या भेटीला घटनास्थळी आला होता. त्यातूनच आरोपींनी त्याचा काटा काढण्याचे उघड झाले.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूरPoliceपोलिसMobileमोबाइल