प्रेयसी ब्रेकअपसाठी बहाणे करत होती, तरीही बॉयफ्रेंडने ऐकले नाही, पुढं जे झालं ते भयंकर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 02:33 PM2022-10-31T14:33:16+5:302022-10-31T14:34:46+5:30

केरळमध्ये एका २३ वर्षीय तरुणाची हत्या झाली आहे. आता या हत्येमागील वेगवेगळे खुलासे समोर आले आहेत. हा तरुण रेडियोलॉजीचा विद्यार्थी होता.

girlfriend killed boyfriend for breakup In Kerala | प्रेयसी ब्रेकअपसाठी बहाणे करत होती, तरीही बॉयफ्रेंडने ऐकले नाही, पुढं जे झालं ते भयंकर...

प्रेयसी ब्रेकअपसाठी बहाणे करत होती, तरीही बॉयफ्रेंडने ऐकले नाही, पुढं जे झालं ते भयंकर...

googlenewsNext

केरळमध्ये एका २३ वर्षीय तरुणाची हत्या झाली आहे. आता या हत्येमागील वेगवेगळे खुलासे समोर आले आहेत. हा तरुण रेडियोलॉजीचा विद्यार्थी होता. या प्रकरणी तिरुअनंतपुरम पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. या तरुणाचे नाव शेरोन राज असं आहे, खून त्याची गर्लफ्रेंड गरिश्मा हिने केल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रेयसीने शेरोनला १४ ऑक्टोबरला भेटण्याच्या बहाण्याने घरी बोलावले आणि त्यानंतर ज्यूसमध्ये कीटकनाशक मिसळून प्यायला दिले. यानंतर शेरोन हा तिच्या घरुन घरी जायला निघाला. यावेळी घरी गेल्यानंतर त्याची तब्येत बिघडली.यानंतर त्याच्या भावाने शेरोनच्या प्रेयसीला विचारले त्याने तिकडे काही खायला दिले का, यावर प्रेयसीने काही दिले नसल्याचे खोटे सांगितले. 

यानंतर कुटुंबीयांनी शेरॉनला बेशुद्ध अवस्थेत घेऊन हॉस्पिटल गाठले. मात्र ११ दिवसांनंतर २५ ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शेरोनचा मृत्यू विषामुळे झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले.

पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा गरिश्माचीही चौकशी करण्यात आली. यावेळी तिच्या बोलण्यातून पोलिसांना संशय आला. सुरुवातीला ती पोलिसांची दिशाभूल करत होती. पण ३० ऑक्टोबरला गरिश्माने आपला गुन्हा कबूल केला. "ती गेल्या एक वर्षापासून शेरोनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र त्याच दरम्यान तिचे लग्न दुसऱ्या मुलाशी ठरले. त्यानंतरही दोघांचे अफेअर सुरूच होते.

गरिश्माला लग्नाची तारीख जवळ येताच हे नाते संपवायचे होते. या मुद्द्यावर तिने शेरॉनशीही चर्चा केली. मात्र त्याने ते मान्य केले नाही. तिने शेरोनला समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने ऐकले नाही. 

पुन्हा चाेरी करण्यास आला अन् अलगद अडकला

यावेळी शेरोनचे स्टेटमेंट घेण्यात आले होते. त्याने यावेळी मला कोणावरही संशय नाही, असं स्टेटमेंट दिले होते. सध्या गरिश्माला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.

Web Title: girlfriend killed boyfriend for breakup In Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.