शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

प्रेयसीने लग्नास नकार दिला; पठ्ठ्याने अडीज कोटींचे घर कवडीमोलाने विकले, लुटारू बनला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2020 8:31 AM

Crime News: आरोपीने चौकशीत दिलेली माहिती पोलिसांना धक्का देणारी होती. प्रेमभंगानंतर अभिषेक गुन्हेगारीकडे वळल्याचे त्यांना समजले.

छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील पोलिसांना मोठे यश हाती लागले आहे. एका वर्षाच्या आत भिलाई, दुर्ग आणि रायपूरमध्ये ५० हून अधिक लूटपाट करणाऱ्या अटट्ल चोराला अटक करण्यात आली आहे. पोलिसांची टीम आरोपी अभिषेक जोशीच्या दोन महिन्यांपासून मागावर होती. त्याचे घर नसल्याने तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने १७ गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच आरोपीने विकलेले एक डझन फोन ताब्यात घेण्यात आले आहेत. 

आरोपीने चौकशीत दिलेली माहिती पोलिसांना धक्का देणारी होती. प्रेमभंगानंतर अभिषेक गुन्हेगारीकडे वळल्याचे त्यांना समजले. प्रेय़सीने लग्नासाठी नकार दिल्यानंतर त्याने अडीज कोटींचा बंगला केवळ १४ लाखांना विकला होता. यानंतर तो अट्टल लुटेरा बनला होता. प्रेयसीवरचा राग आणि बदला तो महिला आणि मुलींना लूटून घेत होता. त्याने आतापर्यंत वर्षभरात असे ५० प्रकार केले. याशिवाय भिलाईमध्ये आरोपीने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीला चाकू मारून लुटालूट केली होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने ऑक्टोबरच्या महिन्यात सुपेला, भिलाईनगरसह अन्य राज्यांमध्ये गुन्हे केले होते. पोलिसांनी आरोपीला पकडण्य़ासाठी सीसीटीव्ही फुटेज चेक केले होते. फुटेजमध्ये त्याची ओळख पटली. त्याच्याकडे वेगळ्याच अशा लाल रंगाची कार होती. पोलिसांनी रायपूरचे देवेंद्र नगर, त्याचे येण्या-जाण्याची ठिकाणे, कुम्हारी टोल प्लाझासह अनेक ठिकाणी चौकशी केली.

आरोपीची माहिती मिळताच पोलिसांनी रायपूरच्या हॉटेल संचालकाशी संपर्क केला. हॉटेल स्टाफ बनून पोलिसांनी त्या हॉटेलची प्रत्येक  खोली चेक केली. ग्राहकांची चौकशी केली. जेव्हा पोलीस आरोपीच्या दरवाजावर पोहोचले तेव्हा त्यांनी त्याच्याकडे आयकार्ड मागितले. आरोपीने दरवाजा उघडताच पोलिसांनी त्याला पकडले. यानंतर त्याने केलेल्या चोऱ्यांचा मुद्देमाल हस्तगत करण्यास सुरुवात झाली. 

कॉलेजमध्ये झाले प्रेमकॉलेजमध्ये शिकत असताना त्याची मैत्री एका मुलीसोबत झाली होती. दोन्ही एकमेकांवर प्रेम करत होते. त्यांना लग्नही करायचे होते. मात्र, त्याच्या आई-वडिलांचा अचानक मृत्यू झाला. त्यानंतर प्रेयसीनेही त्याला लग्नास नकार दिला. तसेच तीने घरच्यांच्या सांगण्यावरून लग्न केले. य़ामुळे दु:खी झालेल्या अभिषेकने आठ वर्षांपूर्वी अडीज कोटींचा बंगला कवडीमोलाने विकून गुन्हेगारीच्या दुनियेत पाऊल ठेवले होते.  

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस