पिंपरी : ओळखीच्या कुटुंबातील मुलीचा वाढदिवस साजरा करून दरवर्षी प्रमाणे बिर्याणी न केल्याने एकाने महिलेवर हत्याराने वर केला. आईला वाचवायला धावलेली मुलगीच त्यात जखमी झाल्याची घटना निगडी येथे घडली. संतोष प्रदीप गायकवाड (वय ४०, राजगृह हाऊसिंग सोसायटी, निगडी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वी हणामारीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी राजू केरप्पा गायकवाड (वय ४१, आझाद चौक, संग्राम नगर, आंबेडकर वसाहत, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे.
दोन्ही गायकवाड कुटुंबांचे घरगुती संबंध आहेत. फिर्यादींच्या मुलीचा दरवर्षी वाढदिवस साजरा केला जातो. त्यावेळी बिर्याणी बनवली जाते. यंदा दरवर्षीप्रमाणे मुलीचा वाढदिवस साजरा का केला नाही, बिर्याणी का केली नाही अशी विचारणा करण्यासाठी आरोपी संतोष गायकवाड फिर्यादीच्या घरी गेला. तेथे त्याचा त्यावरुन वाद झाला. त्यानंतर आरोपी त्याच्या घरी गेला. तेथून त्याने फिर्यादीच्या घरी फोन करून मझ्या घरी वाढदिवस साजरा करू असे सांगितले.
फिर्यादीची बायको आणि मुलगी आरोपीच्या घरी गेले. तेथे पुन्हा त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपी महिलेवर तलवारी सारख्या हत्याराने वार करण्यासाठी धावला. त्यावेळी मुलीने हात मधे घातल्याने तिच्या बोटांना आणि पंजाला दुखापत झाली. आरोपीस अटक करण्यात आली आहे. आरोपीवर काही महिन्यांपूर्वी हाणामारीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत का याचा तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक वर्षाराणी घाटे यांनी दिली.
आणखी बातम्या...
- CoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा
- सर्वात जुना घटक पक्ष एनडीएमधून बाहेर; भाजपा-अकाली दलाची २३ वर्षांची होती युती
- "हिमालयात सर्व नियमांचे पालन केले, तरीही मला कोरोनाची लागण झाली"
- शेतकरी विरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहणार - बाळासाहेब थोरात
- CoronaVirus News : सांगलीतील कोविड सेंटरमधून दोन कैद्यांचे पलायन, शोध सुरु