राजस्थान - बुधवारी सायंकाळी बारांच्या मंगरूळ रोडवर बसमधील एका तरुणीला बसच्या खिडकीतून हात बाहेर काढणं महागात पडलं आहे. बसजवळून जाणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीने धडक दिल्याने मुलीचा एक हात शरीरापासून वेगळा होऊन बाजूला पडला. येथे जिल्हा रुग्णालयातून कापलेला हात वेगळ्या बॅगेत ठेवून कोटा येथे पाठवण्यात आले.हॉस्पिटल चौकीत तैनात कॉन्स्टेबल सुकेश चौधरी यांनी सांगितले की, मंगरोळ येथील रहिवासी ज्योती (१८) बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बारांहून मंगरूळला बसने जात होती. तिने बसच्या खिडकीतून हात घातला. दरम्यान, बडा बालाजीजवळ समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीने धडक दिल्याने ज्योतीचा हात कापला गेला. बस चालकाने तिले तिथेच उतरवले. नंतर ओळखीच्या व्यक्तीने मदत करून तिला जिल्हा रुग्णालयात नेले. येथील परिस्थिती पाहून डॉक्टरांनी त्यांना तातडीने कोटा येथील रुग्णालय रेफर केले.याबाबत पीएमओला माहिती देऊन मोफत रुग्णवाहिकेची व्यवस्था करून मुलीला येथून पाठवण्यात आले. माहिती मिळाल्यानंतर तिचे कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले. बसजवळून क्रॉस करणाऱ्या ट्रॉलीमध्ये उंचावर लोखंडी अँगल लावले असल्याने जवळपास अर्धा तास मुलगी जागीच वेदनेने तडफडत होती.दरम्यान, तेथून जाणाऱ्या एका ओळखीच्या व्यक्तीने माणुसकी दाखवत तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, ज्योतीने हिम्मत हारली नाही, हॉस्पिटलमध्येपोलिसांना सांगितले, मला माझ्या आईशी बोलायचं आहे. काही वेळाने मुलीचे पालक हॉस्पिटलमध्ये पोहोचले. मुलीची अवस्था पाहून आई बेशुद्ध पडली.
अपघातामुळे मुलीचा हात झाला शरीरापासून वेगळा; हात बॅगेत घेऊन गाठलं हॉस्पिटल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 9:18 PM