हैदराबाद : तेलंगानातील महिला डॉक्टरवर झालेल्या सामुहिक बलात्कारानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच बलात्कार करणाऱ्यांना जमावाच्या ताब्यात द्यावे, असे वक्तव्य भाजपाच्याच लोकसभा खासदारांनी संसदेत केल्याने जनभावना किती संतप्त आहे याची जाणीव होते. मात्र, दक्षिणेतील एका निर्मात्याने महिलांना जीव वाचविण्यासाठी सोबत कंडोम ठेवा आणि बलात्कारावेळी सहकार्य करा, असा सल्ला दिल्याने सोशल मिडीयावर संतापाची लाट उसळली आहे.
डॅनिअल श्रवण या विशाखापट्टनममधील निर्मात्याने सोशल मिडीयावर हा सल्ला दिला आहे. त्याने म्हटले आहे की, मुलींनी 100 नंबर डायल करण्यापेक्षा पर्समध्ये कंडोम ठेवावा. कंडोमचा प्रयोग करून स्वत:ला वाचवावे. महिलांची सुरक्षा केवळ कंडोममुळेच होऊ शकते, निर्भया कायद्यामुळे नाही.
''बलात्कार ही गंभीर बाब नाही, परंतु खून अक्षम्य आहे. बलात्कारानंतर खून थांबवा. बलात्कार करणाऱ्यांच्या या सैतानी विचारसरणीस समाज आणि महिला संघटना जबाबदार आहेत. जर कोर्टाने, सरकारने आणि कायद्याने बलात्काराला माफी दिली तर ते बलात्कारानंतरच्या हत्येचा विचार करणार नाहीत. हिंसाचाराविना बलात्कारास कायदेशीर मान्यता देणे, अशा प्रकारच्या हत्या थांबविण्याचा एकमेव मार्ग आहे. यामुळे समाज आणि कायद्याच्या भीतीपासून बलात्कारी बाहेर येईल आणि पीडितेस जिवंत सोडेल. या संदर्भात, बलात्कार हे खुनापेक्षा चांगले आहे. निर्भया आणि प्रियंका प्रकरणात न्याय मिळत नाही. बलात्काराचा अजेंडा म्हणजे बलात्कार करणार्याच्या लैंगिक गरजा पूर्ण करणे आहे. ती स्त्री किंवा पुरुष असू शकते, त्याबाबत काहीच सांगता येत नाही. तर्क म्हणजे हा .. फक्त समाज, कायदा आणि कोर्टाने बलात्काराकडे दुर्लक्ष केल्याच्या भीतीने बलात्कारी अत्याचारी होणार नाही. ज्यांनी वयाची 18 वर्षे ओलांडली आहेत, त्यांनी बलात्कार केल्यावर किंवा मारहाण न करता हिंसाचार करता कामा नये, यासाठी सरकारने उपाययोजना करायला हवी. याशिवाय डॅनियलने देखील एक चिठ्ठी लिहिली आहे - मी बलात्काराला प्रोत्साहन देत नाही, परंतु असे वाटते की मुलीचे आयुष्य वाचविण्याचा हाच योग्य मार्ग आहे.
याशिवाय डॅनिअलने काही कमेंटही केल्या आहेत. यामध्ये 100 नंबर ऐवजी कंडोम ठेवण्याची कमेंटही आहे. यावर एका युजरने त्याला हा सल्ला तो त्याच्या कुटुंबातील महिलांना देऊ शकेल का असे विचारले असता डॅनिअलने त्याव उत्तर दिले आहे. जर त्याच्या कुटुंबातील एखादी महिला अशा कठीण परिस्थितीत फसली असेल तर मी त्यांनाही हेच सांगेन.
वादाचा विषय झाल्यानंतर डॅनिअलने हे पोस्ट डिलीट केले आहेत. मात्र, त्याच्या पोस्टचे स्क्रीनशॉट व्हायरल होऊ लागले आहेत. यानंतर डॅनिअलने हे डायलॉग मी एका सिनेमाच्या खलनायकासाठी लिहीत होतो. मात्र, लोकांनी त्यातून चुकीचा अर्थ घेतला. यासाठी मी माफी मागतो. हे माझे विचार नाहीत. कोणाला दुखविण्याचा विचार नव्हता, अशी सारवासारव केली आहे.