सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथील अंतर्गत रस्त्यावर उभ्या करून ठेवण्यात आलेल्या चार गाड्याचा काचा अज्ञातांकडून दगड मारून फोडण्यात आल्याने एकच खळबळ माजली आहे.यातील तीन गाड्या या स्थानिक नागरिकांच्या आहेत तर एक गाडी कोल्हापूर येथील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची असल्याचे पुढे येत आहे.या प्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून,पोलिस सीसीटिव्हीच्या आधारे युवकांचा शोध घेत आहेत.
सावंतवाडी शहरात प्रथमच सालईवाडा परिसरात लावण्यात आलेल्या गाड्यावर दगडफेकीचा प्रयत्न झाला यातील चार गाड्याच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.विशेष म्हणजे हा प्रकार मध्यरात्रीच्या वेळी धडला आहे.ज्या व्यक्तीने गाडीवर दगड मारून काचा फोडल्या त्याला काहि नागरिकांनी बघितल्याचे सांगण्यात येत आहे.तर हा प्रकार गुरूवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर याबाबत पोलिस ठाण्यात रितसरा तक्रार देण्यात आली आहे.
पोलिसांनी घटनेनंतर सावंतवाडी शहरातील सीसीटिव्ही द्वारे आरोपी चा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण आरोपी सापडला नाही. तसेच या प्रकरणी दोघांनी रितसर तक्रार दिली आहे.विशेष म्हणजे यातील एका गाडी ही कोल्हापूर येथील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची असल्याचे पुढे आले आहे.घटने नंतर राष्ट्रवादीचे व्यापार सेलचे कार्याध्यक्ष हीदायतुल्ला खान यांनी सांगितले कि परिसरात सीसीटीव्ही नसल्याचा फायदा घेऊन काही काहि युवकांनी हा प्रकार केला असल्याचे बोलले जात आहे. याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी करावी,अशी मागणी खान यांनी केली आहे.
आपण घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली या वेळी दुचाकीवरून रात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास आलेल्या एका युवकाने हा प्रकार केल्याचा तेथील स्थानिक नागरिकांचा संशय आहेत काही लोकांनी त्याला पाहिले आहे तो दुचाकी घेऊन त्या ठिकाणी आला होता त्याने दगड घेऊन हा प्रकार केला असे येथील एका महिलेने सांगितले त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी अशी खान यांनी मागणी केली आहे. पोलिस निरिक्षक शशीकांत खोत यांनी घडल्या प्रकार बाबत आम्ही चौकशी करत असून,लवकरच आरोपीला अटक करू दगड मारण्या मागचे कारण समजू शकले नाही दोघांनीही तक्रार दिली असून, अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याचे खोत म्हणाले.