शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
2
अक्षय शिंदेला गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
3
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
4
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
5
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
6
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
7
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
8
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
9
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा
10
दिवसाची कमाई ४५ लाख; कोण आहेत अरविंद कृष्णा? IIT च्या स्कॉलरनं कमावलं मोठं नाव
11
Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक
12
नकळतच सारे घडलं; "मला माफ करा!" १२ वर्षांपूर्वीच्या फोटोमुळं अशी फसली इंग्लंडची कॅप्टन
13
Video - २ लाख देऊन IPS झालेल्या मिथिलेशचं नवं स्वप्न; आता व्हायचंय डॉक्टर, 'हे' आहे कारण
14
जबरदस्त! अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा मिळणार; BSNL'चा 'हा' स्वस्त रिचार्ज प्लॅन ५२ चालणार
15
अक्षय शिंदे एन्काउंटर : ज्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन तिथेच आनंद साजरा
16
Pitru Paksha 2024: गजलक्ष्मी व्रताला द्या स्तोत्राची जोड; सुख, वैभवाशी करावी लागणार नाही तडजोड!
17
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
18
Northern Arc Capital IPO Listing: दमदार लिस्टिंगनं पैशांचा पाऊस, प्रत्येक शेअरवर किती झाला गुंतवणूकदारांना फायदा?
19
Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया
20
तिरुपती मंदिरात ४ तास हवन, सर्वकाही शुद्ध-पवित्र; नेमके कोणते विधी केले? पाहा, महत्त्व

३ लाखांची चोरी शोधता शोधता सापडला १२.८५ लाखांचा मुद्देमाल, तिघांना अटक

By पंकज शेट्ये | Published: August 28, 2023 3:18 PM

मुरगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीतील चोरीचा वास्को पोलीसांनी लावला छडा

पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: वास्को पोलीस दाबोळी परिसरात घडलेल्या चोरीचा छडा लावण्यासाठी रविवारी (दि.२७) रात्री गस्ती लावून चौकशी करित असताना त्यांना दुसºया पोलीस स्थानकाच्या हद्दीत झालेल्या चोरी प्रकरणातील आरोपींना गजाआड करून चोरीला गेलेला माल जप्त करण्यात यश प्राप्त झाझे. चिखली येथील ‘जॉर्गस पार्क’ जवळ रात्री तीन इसम संशयास्पद फीरत असल्याने वास्को पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशीला सुरवात केली. पोलीसांकडून करण्यात येणाºया चौकशीवेळी तिघांनी मुरगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या गोदामातून १२ लाख ८५ हजाराची सामग्री चोरी करून बिर्ला येथील एका ‘स्क्रेप यार्ड’ मध्ये लपवून ठेवल्याची कबूली दिली. त्यानंतर वास्को पोलीसांनी तेथे छापा टाकून चोरीला गेलेला १२ लाख ८५ हजाराचा माल जप्त केला.

दाबोळी येथील एका कंपनीच्या ‘शॅड’ मधून तीन लाखाची सामग्री चोरीला गेल्याची तक्रार नुकतीच वास्को पोलीस स्थानकावर देण्यात आली आहे. पोलीस त्याप्रकरणात चौकशी करण्यासाठी गस्त मारत असताना त्यांना रविवारी रात्री चिखली ‘जॉर्गस पार्क’ जवळ तीन लोक संशयास्पद फीरत असल्याचे आढळून आले. दाबोतील चोरी प्रकरणात हे तिघे संशयित असू शकतात असा संशय आल्यानंतर पोलीसांनी त्यांना अडवून त्यांच्याशी चौकशीला सुरवात केली. मात्र ते तिघेजण योग्यरित्या उत्तर देत नसल्याने त्यांना ताब्यात घेऊन वास्को पोलीस स्थानकावर नेले. तेथे पोलीसांनी त्यांच्याशी कसून चौकशीला सुरवात केली. त्यावेळी तिघांनी मुरगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाच्या गोदामातून विविध सामग्री चोरी केल्याची कबूली दिली. चोरी केलेली सामग्री बिर्ला येथील एका ‘स्क्रेप यार्ड’ मध्ये लपवून ठेवल्याची माहीती वास्को पोलीसांना मिळताच त्यांनी त्वरित त्या ‘स्क्रेप यार्ड’ वर छापा टाकला. वास्को पोलीसांनी त्या ‘स्क्रेप यार्ड’ वर छापा टाकला असता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाच्या गोदामातून चोरीला गेलेली १२ लाख ८५ हजाराची सामग्री तेथे लपवून ठेवल्याचे त्यांना आढळून आले. पोलीसांनी त्वरित ती सामग्री ताब्यात घेऊन जप्त केली.

त्या चोरी प्रकरणाबाबत अधिक माहीतीसाठी पत्रकारांनी वास्को पोलीस निरीक्षक कपील नायक यांना संपर्क केला असता मुरगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या गोदामातून चोरीला गेलेला सर्व माल जप्त केल्याची माहीती दिली. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सहाय्यक अभियंत्याने जप्त केलेला तो माल चोरीला गेला होता अशी पुष्टी केल्याचे निरीक्षक नायक यांनी सांगितले. २४ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचारी सडा येथील गोदामात गेले असता त्या गोदामाचे ‘शटर’ वाकवून तेथून अज्ञात चोरट्यांनी सामग्री लंपास केल्याचे उघड झाले होते. त्यानंतर त्याप्रकरणात मुरगाव पोलीस स्थानकावर तक्रार नोंद केल्यानंतर पोलीस चौकशी करित होते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या गोदामातून १२ लाख ८५ हजाराची सामग्री चोरी केल्याप्रकरणात अटक केलेल्या त्या संशयित आरोपींची नावे नागू गोलार (वय ५०), ओंन्बा राथोड (वय ४०) आणि अपन्ना राथोड (वय ४८) अशी असल्याची माहीती पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी दिली. वास्को पोलीसांनी त्या तिघांनाही सीआरपीसी च्या ४१ कलमाखाली अटक केली असून चोरी प्रकरणातील पुढची चौकशी करण्यासाठी वास्को पोलीस त्या तिघांनाही मुरगाव पोलीस स्थानकाच्या ताब्यात देणार असल्याचे सांगितले.

 

टॅग्स :Arrestअटक