सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने करमाळा तालुक्यातील नेर्ले गावच्या हद्दीत एका आलिशान कारमधून १ लाख ५३ हजार ६०० रूपये किंमतीचे गोवा राज्यातील दारू जप्त केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या करमाळा यथील पथकाचे दुय्यम निरीक्षक शंकर पाटील यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार जवान विकास वडमिले यांच्यासह करमाळा तालुक्यातील नेर्ले गावाच्या हद्दीत पाळत ठेवली असता त्यांना एका अलिशान एमएच ४८ पी ०३८८ या चारचाकी वाहनातून गोवा राज्य निर्मित व विक्रीस असलेले १८० मिलीच्या ९६० बाटल्या वाहतूक होत असल्याचे आढळून आले.
या गुन्ह्यात त्यांनी वाहन चालक निलेश लालासाहेब पडवळे (वय ३१ वर्षे, रा. उमरड, ता.करमाळा) याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. त्यात अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस काेठडी सुनावली आहे. या कारवाईत निरिक्षक सदानंद मस्करे, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, महावीर कोळेकर, जवान अनिल पांढरे यांनी सहकार्य केले.