सावंतवाडी : गोव्याहून कणकवली ओसरगाव च्या दिशेने जाणाऱ्या अलिशान कार मध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली पोलीसांनी कारसह सोळा लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ही कारवाई सोमवारी आरोंदा दुरक्षेत्रावर करण्यात आली आहे.या प्रकरणी भरत तुकाराम जाधव (रा.ओसरगाव कणकवली) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
कल्याण येथील काहि जण कणकवली ओसरगाव येथे लग्न सभारंभासाठी आले होते. ते पुन्हा कल्याण येथे परतत असताना फिरायला गोव्याला गेले होते. तेथून परतत असताना कार मध्ये तब्बल सत्तर हजार रूपयांची गोवा बनावटीची दारू भरली होती. ती कार सावंतवाडी पोलीसांनी आरोंदा दुरक्षेत्रावर पकडली कारमध्ये दारू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीसांनी कारसह चालकाला ताब्यात घेतले.संबंधित संशयित हा मूळ कणकवली येथील आहे.त्याच्याकडून पंधरा लाख 68 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
घरात लग्न असल्यामुळे तो आपल्या ताब्यातील कार घेऊन दारू आणण्यासाठी गेला होता अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे ही कारवाई आरोंदा पोलिसांनी केली याबाबत हवालदार राजाराम तेरेखोलकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, बांदा येथे बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या दारू माफीयांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत आहे. काल सापळा रचून गाडी थांबवण्याचा इशारा करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्याला धक्काबुक्की करत दोघा कार चालकांनी आपल्या गाडीसह पलायन केल्याचा प्रकार येथील इन्सुली सात जांभळी परिसरात घडला आहे.