लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक कोटी २० लाख रुपये सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, यापैकी दोन विमानतळावरून हे सोने बाहेर काढण्यासाठी ते प्रयत्नशील होते. मात्र, त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्या जवळ हे सोने आढळून आले.
मन्सुरी मेहमूद, असे यापैकी एका आरोपीचे नाव असून, तो परदेशातून सोने घेऊन आला होता. तर, विजय पवार आणि सागर सावंत या विमान कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी त्याला हे सोने विमानतळाबाहेर काढण्यासाठी मदत केली होती.