शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बापरे! ३१२२ कोटींचं सोनं गेल्या पाच वर्षात भारतीय विमानतळांवरून केलं जप्त 

By पूनम अपराज | Published: October 28, 2020 4:46 PM

Gold Smuggling : उदारीकरण होईपर्यंत भारतात सोन्याची तस्करी सर्रास होत होती, सोन्याचे दागदागिने वगळता सोन्याच्या आयातीवर बंदी घातल्यास वापरला जाणारा गोल्ड कंट्रोल कायदा 1968 रद्द केला गेला.

ठळक मुद्देपेट्रोलियम आणि सोने हे भारताच्या व्यापार आणि चालू खात्यातील तूट हे मुख्य कारक आहेत. तस्कर सोन्याच्या खरेदीसाठी परकीय चलन वापरतात आणि रुपयाचे मूल्य कमी करतात.अर्थ मंत्रालयाने शेअर केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, केरळमधील चार आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी तीन (कोझिकोड, कोची आणि तिरुअनंतपुरम) तस्करी केलेल्या जास्तीत जास्त सोन्याची जप्त करण्यात आलेल्या १० विमानतळांच्या यादीत आहेत.

भारत हा एक समाज आहे ज्याने सोन्याकडे, मालमत्ता म्हणून आणि प्राचीन काळापासून दागिन्यांच्या रूपात बरेच महत्त्व दिले. इतिहास काळापासून भारत सोन्याची निव्वळ आयातकर्ता आहे. भारतीयांना अजूनही सोन्याबद्दल हे आकर्षण आहे. सर्व देशभर कोविड - १९ या महामारीमुळे बिघडलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्यायाचा शोध घेतल्यामुळे सोन्याच्या किंमती नव्या विक्रमी उच्चांकापर्यंत पोहोचल्या. आजच्या घडीला सोने ही एक महत्वाची मालमत्ता आहे. सोन्याचा लक्झरी म्हणून वापर होतो तसेच गुंतवणूक पण होते. सोने खरेदी करण्याचे बरेच मार्ग आहेत. गुंतवणूकीची विविध उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भिन्न उत्पादने वापरली जाऊ शकतात. उदारीकरण होईपर्यंत भारतात सोन्याची तस्करी सर्रास होत होती, सोन्याचे दागदागिने वगळता सोन्याच्या आयातीवर बंदी घातल्यास वापरला जाणारा गोल्ड कंट्रोल कायदा 1968 रद्द केला गेला. मागणी आणि पुरवठा यांच्यातील प्रचंड तफावत हा सोनं तस्करीच्या वाढत्या कारवायांमागील प्रमुख कारण आणि दुवा बनला. जास्त आयात शुल्क, भ्रष्टाचार आणि पुरवठ्यातील तफावत यामुळे तस्करी होते. भारतात या सर्व बाबी तस्करीसाठी जबाबदार आहेत.रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर वाई व्ही रेड्डी यांनी एकदा नमूद केले होते की, भारतात ८० टक्के सोनीचा वापर दागदागिन्यांसाठी होत आहे. तर केवळ १५ टक्के गुंतवणूक आणि ५ टक्के  औद्योगिक उपयोगात सोनं वापरलं जात आहेत. अशा प्रकारे, सोन्यात गुंतवणूक करणं फारचं फायदेशीर नाही. त्यातील मॅक्रो आर्थिक बाजू आणखी हानिकारक आहे. सोन्याची आयात जितकी जास्त तितकी तूट जास्त. पेट्रोलियम आणि सोने हे भारताच्या व्यापार आणि चालू खात्यातील तूट हे मुख्य कारक आहेत. तस्कर सोन्याच्या खरेदीसाठी परकीय चलन वापरतात आणि रुपयाचे मूल्य कमी करतात.

 

गेल्या पाच वर्षात आणि चालू वर्षात केरळ विमानतळांसह देशातील विविध विमानतळांमधून सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

 

केरळ सोनं तस्करी प्रकरण ह्या वर्षी जुलै महिन्यात वेगवेगळ्या माध्यमातून जवळपास ३० किलो सोन्याची तस्करी करण्यात आली आहे. तिरुअनंतपुरम विमानतळावरुन हे सोनं जप्त करण्यात आलं. हे सोनं संयुक्त अरब अमिरातीमधील दुतावासात पाठवलं जात होतं. कोणत्या माध्यमातून सोन्याची तस्करी करण्यात आली याचा तपास करायचा असल्याने आरोपींना कोठडीत ठेवणं गरजेचं असल्याचा युक्तिवाद एनआयएकडून करण्यात आला. एनआयएकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एक असणाऱ्या रमीज याने चौकशीदरम्यान आपला टंझानियामध्ये हिऱ्यांचा व्यवयास असून तेथून सोनं आणलं होतं आणि युएईमध्ये विकलं असा दावा केला आहे. कस्टम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आणि 16 जणांना अटक केली.आरोपींनी तस्करी प्रकरणी बेकायदेशीर उपक्रम प्रतिबंध कायद्यांतर्गत (युएपीए) कारवाई करण्याला विरोध केला असून हे आर्थिक गुन्ह्यात येत असून दहशतवादाचा याच्याशी काही संबंध नसल्याचा दावा केला आहे. एनआयएने हा दावा फेटाळत काही आरोपींची देशविरोधी संघटनांशी संबंध असल्याचं सांगितलं आहे. एनआयएने कोर्टात माहिती दिली की, आरोपी क्रमांक ५ के टी रमीस आणि आरोपी क्रमांक १३ एम शरफुद्दीन अनेकदा टंझानियाला गेले असून दाऊदचा व्यवहार पाहणाऱ्या फिरोजला भेटले आहेत.अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केरळशी संबंधित दोन सोन्याच्या तस्करी प्रकरणात पीएमएलए कायद्यांतर्गत चौकशी सुरू केली आहे. परकीय विनिमय व्यवस्थापन कायदा (फेमा),१९९९ च्या तरतुदींनुसार संपूर्ण भारतभरातील पाच प्रकरणांमध्ये ईडीने चौकशीही केली. मुख्य आरोपींपैकी एक मुख्य आरोपी असल्याचे कोर्टात कळविण्यात आले. तथापि, निष्पक्ष आणि योग्य तपासणीसाठी शासन प्रभावी पाऊले उचलत आहे.26 ऑक्टोबर 2020 रोजी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) केरळ सोन्याच्या तस्करी प्रकरणात गुंतलेल्या फरारी राबीन्स के. हमीद याला अटक केली. दुबईहून आल्यानंतर त्याला कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली.

 चेन्नई विमानतळावर सोनं जप्त10 ऑक्टोबर 2020 रोजी चेन्नई विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी दुबईहून आलेल्या तीन प्रवाशांकडून 1.32 कोटी रुपये किमतीचे 2.88 किलोग्रॅम सोने जप्त केले आणि त्यांना अटक केली. दुबईहून सोन्याची तस्करी होण्याची शक्यता असलेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे कस्टमने म्हटले आहे की, चेन्नईत आलेल्या तीन प्रवाशांची चौकशी करून त्यांचा शोध घेण्यात आला. त्यांच्या गुदाशयात लपविलेले सोन्याचे पेस्ट बंडल असल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्या गुदद्वारातून सोन्याचे पेस्टचे बारा बंडल (प्रत्येकी चार) जप्त केले. काढल्यानंतर एकूण २.७७ किलो सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्या पॅंटच्या खिशातून (प्रत्येकी एक) ११६ ग्रॅम वजनाचे तीन सोन्याचे बिट्स सापडले.

भारतीय विमानतळांवर पाच वर्षांत ३१२२ कोटी रुपयांचे ११,००० किलोहून अधिक सोने जप्त केलेकेरळ विमानतळांसह देशातील विविध विमानतळांमार्फत सोन्याची तस्करी वाढत असल्याने देशाच्या आर्थिक स्थिरतेवर विपरित परिणाम झाला असल्याचे शासन / अंमलबजावणी संचालनालय / कस्टमच्या लक्षात आले असल्याचं वित्त मंत्रालयाने अलीकडेच म्हटले आहे.मागील वर्षांच्या तुलनेत २०१९ - २०२०मध्ये सोन्याची तस्करी किरकोळ प्रमाणात घसरल्यामुळेही मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोझिकोड आणि कोची येथील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर जास्तीत जास्त तस्करी झालेल्या सोन्याच्या जप्तीची नोंद झाली. मात्र, असे दिसून येते की, विमानतळावर सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर केली जाते, त्या तुलनेत बंदरात तस्करी कमी आढळते. अर्थ मंत्रालयाने शेअर केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, केरळमधील चार आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी तीन (कोझिकोड, कोची आणि तिरुअनंतपुरम) तस्करी केलेल्या जास्तीत जास्त सोन्याची जप्त करण्यात आलेल्या १० विमानतळांच्या यादीत आहेत.

टॅग्स :GoldसोनंSmugglingतस्करीAirportविमानतळIndiaभारतNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाKeralaकेरळ