Goldy Brar Detained: प्रसिद्ध पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचा मुख्य सूत्रधार गोल्डी ब्रार याला अमेरिकेतून ताब्यात घेण्यात आले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ही माहिती दिली आहे. भगवंत मान यांनी सांगितले की, गँगस्टर गोल्डी ब्रारला कॅलिफोर्नियामध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच, पंजाबमध्ये गन कल्चर संपेल, असाही दावा मान यांनी केला.
इंटरपोलने काही काळापूर्वी ब्रारविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. गोल्डी ब्रारवर भारतात 16 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो भारतातून कॅनडाला पळून गेला, पण काही काळापूर्वी त्याने कॅलिफोर्नियाला आपला नवीन अड्डा बनवला होता. 29 मे रोजी सिद्धू मुसेवालाची हत्या झाली होती. मुसेवालाच्या हत्येचा सूत्रधार गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई आहेत. गोल्डी ब्रारला कॅनडात धोका जाणवला, त्यामुळेच तो कॅलिफोर्नियातील फ्रेस्नो शहरात राहू लागला.
ब्रार एफबीआयच्या तावडीतपंजाबमधील श्री मुक्तसर साहिब येथे राहणारा सतींदरजीत सिंग उर्फ गोल्डी ब्रार 2017 मध्ये स्टुडंट व्हिसावर कॅनडाला गेला होता. तो लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सक्रिय सदस्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय एजन्सी त्याचा शोध घेत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन गुप्तचर संस्था एफबीआयने गोल्डी ब्रारला ताब्यात घेतले आहे. गोल्डीला आता कधीही भारतात आणले जाऊ शकते.