दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या कार्याचे मुंबईउच्च न्यायालयाने कौतुक केले आणि म्हटले की, अभिनेताचा चेहरा बघून तो कुणीही सांगेल तो एक चांगला माणूस होता. न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या खंडपीठाने सुशांतसिंग राजपूत बहिणी प्रियंका सिंह आणि मितू सिंग यांच्या याचिकेवर आपला निर्णय देताना हे वक्तव्य केले. या याचिकेत सुशांतच्या मेडिसिन प्रिस्क्रिप्शनमध्ये छेडछाड आणि दिशाभूल केल्याप्रकरणी प्रियंका आणि मीतू यांच्याविरोधात दाखल केलेली एफआयआर रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे.न्यायमूर्ती शिंदे म्हणाले, "प्रकरण काहीही असो .... कुणालाही तो निष्पाप आणि सरळ माणूस होता हे सांगू शकतो... आणि सुशांतसिंग राजपूतचा चेहरा पाहून तो एक चांगला माणूस होता." ते म्हणाले, "एम एस धोनी चित्रपटातील सर्वांनाच सुशांत विशेष आवडला." वांद्रे पोलिसांनी ७ सप्टेंबर रोजी सुशांतच्या बहिणी प्रियंका सिंह आणि मितू सिंग आणि दिल्लीचे डॉक्टर तरुण कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा एफआयआर दाखल करण्यात आला होता. रियाने आपल्या तक्रारीत दावा केला आहे की, या लोकांनी सरकारी रुग्णालयाच्या प्रिस्क्रिप्शनमार्फत बंदी घातलेल्या औषधे दिली आणि औषधांचा डोस, प्रमाणांचा सल्ला घेतल्याशिवाय अभिनेत्याला औषधं दिली गेली. १४ जून २०२० रोजी सुशांत मुंबई उपनगरातील वांद्रे येथील फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता.
चेहऱ्यावरून चांगला व्यक्ती... सुशांतसिंग राजपूतचे मुंबई हायकोर्टाने केले कौतुक
By पूनम अपराज | Updated: January 8, 2021 15:01 IST
Sushant Singh Rajput : या याचिकेत सुशांतच्या मेडिसिन प्रिस्क्रिप्शनमध्ये छेडछाड आणि दिशाभूल केल्याप्रकरणी प्रियंका आणि मीतू यांच्याविरोधात दाखल केलेली एफआयआर रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे.
चेहऱ्यावरून चांगला व्यक्ती... सुशांतसिंग राजपूतचे मुंबई हायकोर्टाने केले कौतुक
ठळक मुद्देन्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या खंडपीठाने सुशांतसिंग राजपूत बहिणी प्रियंका सिंह आणि मितू सिंग यांच्या याचिकेवर आपला निर्णय देताना हे वक्तव्य केले.