मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दबदब्यामुळे गोरखपूर हे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. गुप्तचर यंत्रणेच्या अहवालानुसार अफगानी फियादीनचे दहशतवादी यांच्या गोरखपूर निशाण्यावर असल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर गोरखपूर जिल्ह्यासह राज्यातील इतर अनेक जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे लक्षात घेता जिल्हा पोलीस प्रशासनाने केवळ आपली तयारीच ठेवली नाही तर कोणत्याही समाजविघातक परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्जता ठेवली आहे.
शहरातील जवळपास 50 स्थळांवर गुप्तपणे नजर ठेवली जात आहे. भारत-नेपाळ सीमेवर बारीक नजर ठेवून त्यांनी कोणताही दहशतवादी कट रचण्याचा इशारा देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत श्री राम मंदिराचे भूमिपूजन ते १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनापर्यंत विशेष सतर्कता बाळगली जावी. ISIच्या आदेशानुसार अफगान ट्रेंड फियादीन दहशतवाद्यांकडून हल्ला केला जाऊ शकतो अशी माहिती मिळत आहे.
जवळील जिल्ह्यातही अलर्टदरम्यान, बकरी ईद आणि रक्षाबंधन आणि श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार असे महत्त्वाचे सण देखील आहेत. हे पाहता सीएम सिटी गोरखपूर व्यतिरिक्त अयोध्या, फैजाबाद, आग्रा, लखनऊसह डझनभर शहरांत डीजीपी मुख्यालयाने अलर्ट जारी केला आहे.महत्त्वाच्या आस्थापने आणि धार्मिक स्थळांवर हा हल्ला केला जाऊ शकतो. त्यामुळे हाय अलर्टचा संदेश मिळाल्यानंतर गोरखपूर पोलिस प्रशासनातर्फे कोणत्याही दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी तयारी सुरू आहे. दंगलीचा सामना करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये मॉकड्रील सुरू आहेत. अतिरिक्त पीएसी कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. नेपाळ सीमेवरील जिल्ह्यातील कोणत्याही परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एसएसबीला सतर्क राहण्यास सांगितले गेले आहे.एडीजी झोन गोरखपूर दावा शेरपा यांनी बुधवारी सोनौली बॉर्डरला भेट दिली. हा हाय अलर्ट असलेला भाग मानला जात आहे. गोरखनाथ मंदिराच्या रक्षणासाठी गोरखनाथ खिचडी जत्रेच्या वेळी तयार करण्यात आलेल्या पथकाला देखील सज्ज राहण्यास सांगितले आहे. या व्यतिरिक्त रेल्वे स्थानक, बस स्थानके, मॉल्स आणि गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलिंग व तपासणी वाढविण्यात येत आहे. कोणतीही दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यासाठी अशा प्रकारे कंबर कसण्यात आली आहे.
एसएसपी डॉ. सुनील गुप्ता म्हणाले की, उत्सव लक्षात घेता जिल्ह्यात हाय अलर्ट जरी करण्यात आला आहे आणि कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पोलिस पूर्णपणे सज्ज आहेत.विशेष स्थानांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. विशेषत: मंदिर सुरक्षेसाठी एक विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. छुप्या कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक कामांवर लक्ष ठेवले जात आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मुंबई पोलिसांकडून सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबावर दबाव; वकीलाने लावला गंभीर आरोप
लोअर परेल येथून २१ लाख किंमतीच्या बनावट एन -९५ मास्कचा साठा जप्त
स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश
...म्हणून बिहार पोलिसांचे पथक मुंबईत धडकल्याने रियाने घेतली सुप्रीम कोर्टात धाव
भिवंडीत मित्रांसोबत पोहायला गेलेल्या इसमाचा मृत्यू
Video : लेकीसाठी आई चक्क चढली एसपी कार्यालयासमोरील झाडावर अन् केला आत्महत्येचा प्रयत्न
खळबळजनक! गवळी गँगच्या हस्तकाची तळोजा कारागृहात आत्महत्या
तरुणी प्रेमात सैराट; प्रियकरासोबत पळून जाण्याआधी स्वत:च्याच घरातून १३ लाखांची चोरी केली अन्...