शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

ग्रामपंचायत माजी सदस्याच्या कानशिलात लगावली; पोलीस उपनिरीक्षकाची तत्काळ उचलबांगडी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 8:46 PM

Crime News : हिंजवडीतील प्रकार : पोलीस आयुक्तांकडे तक्रार

ठळक मुद्दे ‘ए चल निघ सूट’ असे बोलून आहिरे हे जाधव यांना म्हणाले. साहेब माझी काय चूक आहे, तुम्ही मला का ओरडता, असे जाधव यांनी आहिरे यांना विचारले. त्यामुळे चिडलेल्या आहिरे यांनी जाधव यांच्या कानशिलात लगावल्याचे तक्रारीत नमूद आहे. 

पिंपरी : ग्रामपंचायतचा माजी सदस्य निवेदन घेऊन पोलीस ठाण्यात आला. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षकाने त्याच्या कानशिलात लगावली. हिंजवडी येथे मंगळवारी (दि. १६) हा प्रकार घडला. पंडित आहिरे, असे पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी श्रीकांत दिलीप जाधव यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे तक्रार केली आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार जाधव हे हिंजवडी ग्रामपंचायतचे माजी सदस्य आहेत. जाधव हे मंगळवारी निवेदन घेऊन पोलीस ठाण्यात गेले. त्यावेळी उपनिरीक्षक आहिरे कर्तव्यावर होते. जाधव यांनी उपनिरीक्षक आहिरे यांच्याकडे निवेदन दिले. ते निवेदन घेतले आहिरे यांनी घेतले. ‘ए चल निघ सूट’ असे बोलून आहिरे हे जाधव यांना म्हणाले. साहेब माझी काय चूक आहे, तुम्ही मला का ओरडता, असे जाधव यांनी आहिरे यांना विचारले. त्यामुळे चिडलेल्या आहिरे यांनी जाधव यांच्या कानशिलात लगावल्याचे तक्रारीत नमूद आहे. 

या प्रकारानंतर हिंजवडी ग्रामपंचायतच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. त्यानंतर, पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे देखील तक्रार केली. तत्काळ कारवाई करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले. सदरच्या घटनेबाबत चाैकशी करण्यात येईल. यात संबंधित पोलीस उपनिरीक्षकाची चुकी असल्यास तसा कसुरी अहवाल पाठविण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी सांगितले. 

गेल्या वर्षी झाली होती बदलीदरम्यान, पोलीस आयुक्तालयांतर्गत उपनिरीक्षकांच्या डिसेंबर २०२० मध्ये बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात पंडीत आहिरे यांची हिंजवडी पोलीस ठाण्यातून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली होती. मात्र हिंजवडीतून रिलिव्ह केले नसल्याने उपनिरीक्षक आहिरे हे तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात रुजू झाले नव्हते. मंगळवारी झालेल्या प्रकारानंतर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर आहिरे यांना तत्काळ हिंजवडी पोलीस ठाण्यातून तत्काळ रिलिव्ह करण्यात आले असून, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसTransferबदलीgram panchayatग्राम पंचायतcommissionerआयुक्तPuneपुणे