शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
3
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
4
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
5
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
6
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
7
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
8
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
9
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
10
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
11
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

मुलींचे मृतदेह कबरीतून काढून घर सजवले, कोण आहे हा 'इतिहासकार'?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2022 3:07 PM

मॉस्कविनला रशियन पॅनेल कोडच्या कलम 244 अंतर्गत दोषी ठरविण्यात आले, ज्यामध्ये कबरे आणि मृतदेहांची विटंबना करण्यासाठी शिक्षेची तरतूद आहे.

ग्रेव्ह थीफ : रशियाच्या एका कुख्यात गुन्हेगाराने लग्न करण्यासाठी मानसिक संस्थेकडून सुटकेची मागणी केली आहे. हा माणूस स्मशानभूमीतून मुलींचे मृतदेह चोरून घरी घेऊन जायचा. मग तो त्यांना घरात बाहुल्यांच्या रूपात सजवत असे. त्याने 26 मुलींचे मृतदेह घरात ठेवले होते. अनातोली मॉस्कविन (Anatoly Moskvin)असे या माणसाचे नाव आहे आणि एकेकाळी तो इतिहासकार होता.अनातोली मॉस्कविनने (Anatoly Moskvin) विनंती केली आहे की, त्याला रशियामधील मानसिक संस्थेतून सोडण्यात यावे जेणेकरून तो लग्न करू शकेल. डेली स्टारच्या वृत्तानुसार, ५५ वर्षीय मॉस्कविन हे रशियातील निझनी नोव्हगोरोड शहरातील रहिवासी आहेत. मॉस्कविनला नोव्हेंबर 2011 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याच्यावर ३ ते १२ वयोगटातील २६ मुलींचे मृतदेह कबरीतून बाहेर काढल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याचा व्हिडिओही जारी केला. ज्यामध्ये हे मृतदेह सोफ्यावर ठेवण्यात आले होते.

मॉस्कविनला रशियन पॅनेल कोडच्या कलम 244 अंतर्गत दोषी ठरविण्यात आले, ज्यामध्ये कबरे आणि मृतदेहांची विटंबना करण्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. मॉस्कविनला नंतर मनोचिकित्सकाकडे उपचारासाठी पाठवण्यात आले. अटकेनंतर दिलेल्या मुलाखतीतही त्याने आपल्या मुलांबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी, त्याने असेही सांगितले होते की, त्याचा विश्वास आहे की, तो विज्ञान किंवा काळ्या जादूद्वारे त्यांचे जीवन परत आणू शकतो.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrussiaरशियाPoliceपोलिस