अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी बॉलीवूडमध्ये खळबळ माजली असून चित्रपट दिग्दर्शक करण जोहर, एकता कपूर, संजय लीला भन्साळी आणि अभिनेता सलमान खान यांच्या विरोधात दाखल केलेला खटला बिहार उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. १४ जून रोजी सुशांतचा आत्महत्येनंतर जवळपास तीन दिवसांनंतर ही याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यात काही ए-लिस्टर्सवर सुशांत या अभिनेताला त्याच्याबद्दल अन्यायकारक वागणूक देऊन नैराश्यात आणल्याचा आरोप होता. दरम्यान, याचिकाकर्त्या वकिलाने आता असे सांगितले आहे की, असे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडलेल्यांना शिक्षा होऊन सुशांतला न्याय मिळावा म्हणून तो सीजेएमच्या निर्णयाला जिल्हा न्यायालयासमोर आव्हान देऊ. अनेक चाहत्यांनी, राजकारण्यांनी आणि काही सहकाऱ्यांनी अभिनेत्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधन होऊन २५ दिवस झाले आहे. आतापर्यंत पोलिसांनी 30 पेक्षा जास्त लोकांचा जबाब नोंदवला आहे. सुशांतचे फॅन्सचे म्हणणे आहे की त्याने आत्महत्या केली नाही तर त्याचा खून करण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी. मुंबई पोलीस सुशांतच्या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. न्यूज 18च्या रिपोर्टनुसार पोलिसांनी सुशांतच्या बिल्डिंगची CCTV रेकॉर्डिंग ताब्यात घेतली आहे. आता पोलिस फॉरेंन्सिक रिपोर्टची प्रतीक्षा करत आहेत. सुशांतच्या फॅन्ससोबतच रुपा गांगुली, शेखर सुमन आणि आणखी काही कलाकारांनी सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या धक्क्यातून अद्यापही चाहते सावरलेले नाहीत. आता त्याच्या एका चाहत्याने थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा दरवाजा ठोठावला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर
Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल
विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस
पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा
पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य
किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ
राजगृहावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल, एकास घेतले ताब्यात
खाकीला काळिमा! पोलीस अधिकारी महिलेचा पोलिसाकडून विनयभंग