प्रेयसीसोबत खोटं बोलून दुसरीशीच करत होता लग्न, नवरदेव मंडपाऐवजी रेपच्या आरोपात पोहोचला तुरूंगात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 04:13 PM2022-04-21T16:13:45+5:302022-04-21T16:22:24+5:30
Groom Arrested before marriage : आरोपी राजगढ जिल्ह्यातील सारंगपूरचा राहणारा आहे. तो बॅंकेत इन्शुरन्सचं काम करतो आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या तरूणीसोबत त्याचं प्रेमप्रकरण सुरू होतं.
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदुरमध्ये (Indore Crime News) पोलिसांनी एका नवरदेवाला अटक केली आहे. बॅंकमध्ये सोबत काम करणाऱ्या तरूणीसोबत त्याचं दोन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होतं. लग्नाचं आमिष दाखवत त्याने अनेकदा तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते आणि त्यानंतर तो गपचूपपणे दुसऱ्या एका तरूणीसोबत लग्न करत होता. जशी याची माहिती तरूणीला मिळाली तिने पोलिसात तक्रार दिली आणि वरात निघण्याआधीच नवरदेवाला रेपच्या आरोपात अटक करण्यात आली.
आरोपी राजगढ जिल्ह्यातील सारंगपूरचा राहणारा आहे. तो बॅंकेत इन्शुरन्सचं काम करतो आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या तरूणीसोबत त्याचं प्रेमप्रकरण सुरू होतं. प्रेयसीला जेव्हा समजलं की, तिचा प्रियकर लपवून लग्न करत आहे तर ती लगेच सांरगपूरला गेली आणि पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी सांगितलं की, याप्रकरणी इंदुरमध्ये तक्रार द्यावी लागेल. ती लगेच इंदुरला परतली आणि पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी लगेच कारवाई करत सांगरपूरला एक टीम पाठवली आणि नवरदेवाला अटक केली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवरदेवाची वरात बुधवारी सारंगपूरच्या खिचलीपूरला जाणार होती. पण मंगळवारी रात्रीच त्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपीवर रेपचा गुन्हा दाखल केला. घोडीवर बसण्याआधीच नवरदेव तुरूंगात गेला.
विजय नगर प्रभारी तहजीब काजी यांच्यानुसार, रात्री उशीरा एक तरूणी आली होती आणि ती चिंतेत दिसत होती. तरूणीने पोलिसांना सांगितलं की, तिचं एका तरूणीसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं आणि त्याने अनेकदा तिचं शारीरिक शोषण केलं. तरूणीने सांगितलं की, आरोपी बऱ्याच महिन्यांपासून लग्नाच्या नावावर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होता.
दोन दिवसांआधी तो इंदुरमध्ये तरूणीला घरी जात असल्याचं सांगून गेला होता आणि परत आल्यावर लग्न करू असं म्हणाला होता. यादरम्यान तरूणीला समजलं की, बुधवारी तिच्या प्रियकराचं लग्न होणार आहे. ज्यानंतर ती लगेच सारंगपूरला पोहोचली. त्यानंतर पुन्हा इंदुरला येऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी नवरदेवाला अटक केली.