शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

शुभमंगल सावधान म्हणण्यापूर्वीच वधूला सोडून वर पसार, समोर आलं धक्कादायक कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 7:44 PM

Marriage News: विवाहसोहळ्यात वरमाला आणि सप्तपदीचा विधी होण्यापूर्वी वर आणि वऱ्हाडी मंडळी मंडपातून पसार झाली. इकडे वधू सप्तपदीची वाट पाहत राहिली.

जयपूर - राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील तारपुरा गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे विवाहाचे विधी सुरू होते. मात्र विवाहसोहळ्यात वरमाला आणि सप्तपदीचा विधी होण्यापूर्वी वर आणि वऱ्हाडी मंडळी मंडपातून पसार झाली. इकडे वधू सप्तपदीची वाट पाहत राहिली. मात्र तिला कसलीच खबर लागून न देता नवरदेव पळून गेला. दरम्यान, ऐन लग्नसोहळ्यातून वर पसार होण्यामागे हुंड्याचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. आता या लोभी नवरदेवाला धडा शिकवण्यासाठी वधूने आज थेट पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. तसेच वरावर कठोर कारवाईची मागणी केली. (Groom ran away with the procession leaving the bride amidst the wedding Hall )

मिळालेल्या माहितीनुसार तारपुरा गावातील सूरजा राम जांगिड यांची मुलगी सुभिता हिचा विवाह बुगाला गावातील रहिवासी असलेल्या अजय याच्यासोबत निश्चित झाला होता. ३ जुलै रोजी संध्याकाळी अजय याची वरात सुभिताच्या घरी आली. वऱ्हाडी मंडळींनी चहा नाश्ता घेतला. त्यानंतर वरमाला घालण्याचा कार्यक्रम झाला मात्र या कार्यक्रमादरम्यानच वर पक्षाने हुंड्याची मागणी सुरू केली. त्यानंतर वऱ्हाडी मंडळींनी मंडपातून काढता पाय घेतला. काही वेळाने वर आणि त्याचे सहकारीही वधूला सोडून निघून गेले.

सप्तपदीच्या वेळी जेव्हा वधूच्या कुटुंबाला याची माहिती मिळाली. त्यानंतर मागचे दोन दिवस दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र त्यातून कुठलाही तोडगा न निघाल्याने अखेरीस वधूचे कुटुंबीय पोलीस अधीक्षकांजवळ पोहोचले. वराच्या कुटुंबीयांनी हुंड्याबाबत आपल्याला मारहाण केली आणि शिविगाळही केली. आपण वराच्या कुटुंबीयांना खूप विनवणी केली. मात्र ते वरात घेऊन परत गेले.

दरम्यान, वधूने पोलिसांना सांगितले की, गेल्या वर्षभरापासून अजय हा तिच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होता. मात्र आता तो तिला सोडून गेला आहे. या कृत्यासाठी त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी विनंती तिने पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी वधूपक्ष पोलिसांवरही आरोप करत होता. अखेरीस त्यांना पोलीस अधिक्षकांकडे धाव घ्यावी लागली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नRajasthanराजस्थान