बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील एका हत्येच्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. हा आरोपी लग्न करण्यासाठी लग्न मंडपाकडे जातच होता तेव्हाच त्याला पोलिसांनी अटक केली. ही घटना बस्ती गावातील आहे. गेल्यावर्षी १० जानेवारीला गौतम सिंह उर्फ फंटू सिंह याची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. यात अनेक लोक आरोपी होते. त्यातील एक म्हणजे अविनाश कुमार हाही होता.
असे सांगितले जात आहे की, अविनाश कुमार घटनेपासून फरार होता आणि पोलीस त्याचा शोध घेत होते. पण अनेक प्रयत्न करूनही तो सापडत नव्हता. अशात शोध घेता घेता पोलिसांना खबर लागली की अविनाश दैली गावात आला आहे. माहिती मिळताच पोली घटनास्थळी पोहोचले. तेव्हा अविनाश नवरदेव बनून गाडीवर नुकताच बसला होता. पोलिसांनी त्याला लगेच धरलं आणि अटक केली. (बघा : Viral Video: बघता-बघता तरूणीने तलावात घेतली उडी, मागून भाऊही आला आणि मग...)
असे सांगितले जात आहे की, हत्येचा आरोपी अविनाशची वरात दैली गावातून जहानाबादला जाणार होती. पण नवरदेव बनलेला अविनाश लग्न मंडपात पोहोचण्याआधी तुरूंगात पोहोचला. पोलिसांनुसार अविनाश यानेच गौतम सिंहच्या हत्येत रेकी करण्याचं काम केलं होतं. अविनाशकडूनच सर्व माहिती घेतली जात होती. ही घटना झाल्यावर अविनाश दिल्लीला पळून गेला होता. तिथे तो बरेच दिवस लपून राहिला. दरम्यान त्याचं लग्न जुळलं आणि तो लग्न करण्यासाठी गावात परतला होता.